Marathi News> भारत
Advertisement

जेव्हा हत्ती सिंहाच्या कळपाजवळ पोहोचतो... तुम्हाला काय वाटतं पुढे काय झालं असेल?

सोशल मीडियावर नेहमीच आपल्याला वेगवेगळे व्हिडीओ पाहायला मिळतात. असाच एक व्हिडीओ व्हायरल होत आहे. जो एका जंगलातील आहे.

जेव्हा हत्ती सिंहाच्या कळपाजवळ पोहोचतो... तुम्हाला काय वाटतं पुढे काय झालं असेल?

मुंबई : सिंह हा जंगलाचा राजा आहे. त्याच्यापासून सगळेच प्राणी चार पाऊलं लांब राहातात. कारण त्याला कधी राग येईल आणि तो कधी कोणत्या प्राण्यावरती वार करेल, याचा अंदाजा कोणीच लावू शकत नाही. परंतु या हत्तीने मात्र याचा विचारच केला नाही आणि गेला सिंहाच्या समोर. तेथे 1-2 नाही तर 5 ते 6 सिंह कळपात बसलेले असतात. तरीही हा हत्ती त्यांच्या समोर जाण्याचा निर्णय करतो. परंतु त्यानंतर जे घडलं ते तुम्हाला अश्चर्यचकित करेल.

सोशल मीडियावर नेहमीच आपल्याला वेगवेगळे व्हिडीओ पाहायला मिळतात. असाच एक व्हिडीओ व्हायरल होत आहे. जो एका जंगलातील आहे. या व्हिडीओने एकच खळबळ उडवली आहे.

तुम्ही व्हिडीओमध्ये पाहू शकता की, झाडाखाली सुस्तावलेल्या सिंहाचा कळप बसलेला असतो. त्यांना घाबरवण्यासाठी एक हत्ती पळत येतो. त्यानंतर आश्चर्याची गोष्ट अशी की एकट्या हत्तीला पाहून चक्क 4-5 सिंह धुम ठोकतात. 

एका हत्तीने जंगलाच्या राजाला पळवून लावल्यामुळे सोशल मीडियावर युजर्सने हा व्हिडीओ उचलून धरला आहे. ज्यामुळे तो सध्या ट्रेंड होत आहे.

 
 
 
 
 
 
 
 
 
 
 
 
 
 
 

 

हा व्हिडीओ africanwildlife1 नावाच्या इंस्टाग्राम अकाउंवरुन शेअर करण्यात आला आहे. ज्याला अगदी काही दिवसातच 16 हजारांपेक्षा जास्त व्ह्युज मिळाले आहेत.

Read More