Marathi News> भारत
Advertisement

PF Account: पीएफ खात्याला नॉमिनी असणं का गरजेचं? याचे फायदे काय? जाणून घ्या

सध्या ईपीएफओ हे पीएफ खातेधारकांना नॉमिनीचे नाव जोडण्यासाठी वारंवार सतर्क करत आहे.

PF Account:  पीएफ खात्याला नॉमिनी असणं का गरजेचं? याचे फायदे काय? जाणून घ्या

मुंबई : पीएफ खाते हे आपल्या भविष्यातील गुंतवणूकीसाठी महत्वाचे असते. निवृत्तीच्यावेळी पीएफ खाते खूप उपयुक्त आहे. यामुळे आपल्याला पेन्शन मिळते. परंतु पीएफ खातेदारांसाठी नॉमिनी असणे तेवढेच गरजेचे आहे. जर दुर्दैवाने तुमच्यावर मृत्यूचे संकट ओढवले, तर कायदेशीररित्या तुमच्या नॉमिनीला तो पैसा दिला जातो. एवढेच नाहीतर खातेधारकाच्या मृत्यूनंतर नॉमिनी असलेल्या व्यक्तीला पैसे दिले जातात.

सध्या ईपीएफओ हे पीएफ खातेधारकांना नॉमिनीचे नाव जोडण्यासाठी वारंवार सतर्क करत आहे. नॉमिनीचे नाव जोडल्यानंतर तुमचा पैसा त्यांना मिळण्यास मदत होईल. असे न केल्यास तुमच्या कुटूंबाला अनेक अडचणींचा सामोरे जावे लागेल. त्याच बरोबर त्यांच्या हातात तुमच्या मेहनतीचा पैसा देखील जाणार नाही.

काय आहे नॉमिनीचे फायदे?

ईपीएफने ट्विटरच्या माध्यमातून याबद्दलची संपूर्ण माहिती शेअर केली आहे. यानुसार, खातेधारकांचा मृत्यू झाल्यास नॉमिनीला आजीवन पेन्शन मिळते. तसेच कलम 95 नुसार नॉमिनीला विविध सुविधेचा लाभ मिळतो. याशिवाय खातेधारकांच्या आई-वडिलांना कुठलाही उत्पन्नाचा स्त्रोत नसेल, तर त्यांना विडो पेन्शन दिली जाते. ज्यामुळे त्यांना आयुष्यभर पेन्शन मिळतो.

ईपीएफच्या अधिकृत वेबसाईटवर लॉगईन केल्यास ईपीएफच्या होमपेजवर सर्व माहिती तुम्हाला मिळते. यामध्ये तुम्हाला लवकरात लवकर नॉमिनीचे नाव देण्यासाठी सतर्क करण्यात आले आहे.

नॉमिने कसे अ‍ॅड करावे?

यापूर्वी कर्मचार्‍यांना भविष्य निर्वाह निधीत फंड जॉईन करताना त्यांच्या नॉमिनीचा एकदा डिटेल्स द्यावा लागत होता आणि एकद तो नॉमिनी टाकला की, त्याला पुन्हा बदलता येत नाही. परंतु आता ईपीएफओने ते ऑनलाईनही केले आहे, त्यामुळे आता आपण केवळ ऑनलाईनद्वारे नॉमिनीचे नाव जोडू शकता.

हे करण्यासाठी प्रथम ईपीएफओच्या अधिकृत वेबसाईटवर जा आणि नंतर 'Manage' ऑप्शनवर जा आणि त्यावर ई-क्लिक करुन नॉमिनीवर क्लीक करा. 
क्लीक केल्यानंतर एक पेज उघडेल, जिथे तुम्ही तुमची माहिती भरू शकता. यात तुम्हाल नॉमिनी व्यक्तीचे नाव, त्यांचा फोटो, फंडची टक्केवारी इत्यादी भरावा लागेल.

नियम काय आहेत?

तुम्ही आणि तुमच्या कंपनीने पीएफ खात्यात जमा केलेली रक्कम दोन भागांमध्ये विभागली जाते.

तुमच्या खात्याचा एक भाग ईपीएफ म्हणून आणि काही भाग पेन्शन फंड म्हणून जमा केला जातो. यामध्ये ईपीएफचे पैसे एक रकमी मिळू शकतात, परंतु पेन्शन फंड हा केवळ पेन्शनच्या स्वरूपात परत केला जातो.

Read More