Marathi News> भारत
Advertisement

बँका आणि विमा कंपन्या तुमच्याकडून Cancelled Cheque का मागतात? जाणून घ्या

तुमच्याकडून कॅन्सेल चेक का मागितला जातो? 'हे' आहे रंजक कारण

बँका आणि विमा कंपन्या तुमच्याकडून Cancelled Cheque का मागतात? जाणून घ्या

मुंबई : तुम्ही कोणत्याही बँकेत किंवा विमा कंपन्यांमध्ये गुंतवणूक करत असाल तर अनेक वेळा तुम्हाला आर्थिक कामात कॅन्सेल चेक (Cancelled Cheque) देण्यास सांगितले जातो. डिजिटलायझेशनकडे आपण वाटचाल करत असलो तरीही आज कॅन्सेल चेकच महत्व अबाधित आहेत. तुमच्या बँक खात्याची संपूर्ण माहिती विमा कंपन्यांना देऊनही सुद्धा कॅन्सेल चेक मागण्याचे कारण काय असू शकते हे तुम्हाला माहिती आहे का? नाही ना, मग चला तर जाणून घेऊया.  

कॅन्सेल चेकवर ही गोष्ट महत्वाची 
जेव्हा तुम्ही एखाद्याला कॅन्सेल चेक (Cancelled Cheque)  देता तेव्हा चेकवर सही करण्याची गरज नसते. यावर तुम्हाला फक्त कॅन्सेल लिहायचे असते. याशिवाय चेकवर क्रॉस मार्क करता येतो. या प्रकारचा चेक फक्त तुमच्या खात्याची पडताळणी करतो. जर तुम्ही बँकेचा कॅन्सेल चेक कोणत्याही संस्थेला दिला असेल तर याचा अर्थ तुमचे त्या बँकेत खाते आहे.तुमचे नाव चेकवर असू शकते किंवा नसू शकते. तुमचा खाते क्रमांक लिहिलेला आहे आणि खाते ज्या शाखेत आहे त्याचा IFSC कोड लिहिला आहे. 

चेक कधी आवश्यक आहे?
जेव्हा तुम्ही फायनान्सशी संबंधित कोणतेही काम करता तेव्हा कॅन्सेल चेक विचारला जातो. तुम्ही कार लोन, पर्सनल लोन, होम लोन घेता तेव्हा  तुम्हाला कॅन्सेल चेक (Cancelled Cheque)  देण्यास सांगतात. हे फक्त तुमचे खाते वेरीफाय (Verify) करण्यासाठी केले जाते. तुम्ही भविष्य निर्वाह निधीतून ऑफलाइन पैसे काढल्यास, कॅन्सेल चेक आवश्यक आहे. तुम्ही म्युच्युअल फंडात गुंतवणूक केल्यास, कंपन्या कॅन्सल चेकबद्दल माहिती विचारतात. याशिवाय विमा पॉलिसी घेतानाही याची गरज असते.

कॅन्सल चेक देताना 'या' गोष्टी लक्षात ठेवा
कॅन्सल चेक (Cancelled Cheque) निरुपयोगी आहे असे तुम्हाला वाटत असेल तर असा विचार करून कोणीही कॅन्सल केलेला चेक देऊ नये. कॅन्सल केलेल्या चेकमध्ये तुमच्या बँक खात्याशी संबंधित महत्त्वाची माहिती असते. याचा वापर तुमच्या खात्यातून फसवणूक करून पैसे काढण्यासाठी केला जाऊ शकतो. अशा परिस्थितीत, स्वाक्षरी केलेला चेक कधीही रद्द करा आणि कोणालाही देऊ नका.

दरम्यान वरील माहितीनुसार तुम्हाला कळालंच असेल कॅन्सेल चेकच (Cancelled Cheque)  महत्व काय आहे. तसेच त्याचा दुरूपयोग टाळण्यासाठी कशी सावधगिरी बाळगली पाहिजे याची माहिती देखील देण्यात आली आहे.  

Read More