Marathi News> भारत
Advertisement

केवळ काळ्या रंगाचेच का असतात टायर? का नाही बदलत यांचा रंग?

गाडीच्या टायरचा रंग हा नेहमी काळा का असतो?

केवळ काळ्या रंगाचेच का असतात टायर? का नाही बदलत यांचा रंग?

मुंबई : गाडी घेताना आपण प्रत्येक गोष्टीचा विचार करतो. यामध्ये गाडीचा रंग कोणता असावा याचा देखील चांगला विचार करण्यात येतो. तुमच्या आमच्या प्रत्येकाच्या गाडीला असणारे टायर मात्र एकाच रंगाचे असतात. मात्र तुम्ही कधी याचा विचार केलाय का? की आपल्या प्रत्येक गाडीच्या टायरचा रंग हा काळा का असतो? आज आम्ही तुम्हाला या प्रश्नाचं उत्तर देणार आहोत. चला तर मग जाणून घेऊया गाडीच्या टायरचा रंग हा नेहमी काळा का असतो?

अनेक रिपोर्ट्सनुसार, पूर्वीच्या काळात गाड्यांचे टायर हे रबरपासून बनवले जात होते. परंतु तुम्हाला हे माहित असेल की रबरचा नैसर्गिक रंग काळा नसतो. रबरापासून बनवलेले टायर लवकर खराब होतात. त्यामुळे गाड्यांना रबराचे टायर वापरणं ही एक मोठी समस्या ठरू लागली. 

दरम्यान यानंतर तज्ज्ञांनी यावर संशोधन केलं. तज्ज्ञांनी केलेल्या संशोधनात त्यांना असं आढळून आलं की, जर कार्बन आणि सल्फर रबरमध्ये मिक्स केलं तर टायर अधिक खूप मजबूत होतात. शिवाय या मिश्रणाचे टायर जास्त काळ टिकू शकतील.

रबराचा मूळ रंग हा हलका पिवळा असतो. दरम्यान टायर बनवण्यासाठी रबरमध्ये कार्बन मिसळला जातो आणि त्यामुळे टायर लवकर झिजले जात नाही. कार्बनचा रंग काळा असतो, त्यामुळे ज्यावेळी रबरमध्ये कार्बन मिसळला जातो तेव्हा तो काळा होतो. परिणामी टायरचं अल्ट्राव्हायोलेट किरणांपासूनही संरक्षण होते.

एका अहवालानुसार, एक साधा रबराचा टायर केवळ 8 हजार किलोमीटर धावू शकतो. दुसरीकडे कार्बन मिक्स केलेला रबराचा टायर सुमारे 1 लाख किलोमीटर धावू शकतो.

Read More