Marathi News> भारत
Advertisement

ज्याने चेहऱ्यावर फेकलं अॅसिड, त्याच्यासोबतच जुळले प्रेमाचे सूर आणि पार पडला विवाह

एका महिलेने त्याच पुरुषाशी लग्न केले आहे ज्याने तिच्या चेहऱ्यावर अॅसिड फेकले आणि ती जवळजवळ आंधळी आणि विकृत झाली. 

ज्याने चेहऱ्यावर फेकलं अॅसिड, त्याच्यासोबतच जुळले प्रेमाचे सूर आणि पार पडला विवाह

अंकारा : अॅसिड हल्ल्याच्या अनेक घटना हृदय पिळवटून टाकणाऱ्या असतात. यासाठी शिक्षेचेही अनेक कायदे आहेत. जगभर हा एक मोठा गुन्हा आहे. पण नुकतेच एक प्रकरण समोर आले आहे, ज्यात तरुणीने तिच्यावर अॅसिड फेकणाऱ्या व्यक्तीसोबत लग्न केले. हे प्रकरण तुर्कस्तानमधील आहे जिथे महिलेने त्याच पुरुषाशी लग्न केले आहे ज्याने तिच्या चेहऱ्यावर अॅसिड फेकले होते, ज्यामुळे ती जवळजवळ आंधळी आणि विकृत झाली आहे. या अॅसिड हल्ल्यानंतर 20 वर्षांच्या मुलीला आता फक्त 30% दिसत आहे.

तुरुंगातून सुटल्यानंतर लग्न

ही व्यक्ती तुरुंगात होती, परंतु कोविडमुळे नियमांमध्ये बदल झाल्यामुळे त्याची तुरुंगातून लवकर सुटका झाली. सोशल मीडियावर लोक या मुलीवर टीका करत आहेत. त्यांनी हे कृत्य करायला नको होते, असे ते म्हणाले. या मुलीचे नाव बर्फिन ओझेक आहे, तिने ज्या व्यक्तीशी लग्न केले आहे त्याचे नाव कासिम ओझान सेल्टी आहे.

ब्रेकअपनंतर ऍसिड हल्ला

2019 मध्ये ब्रेकअप झाल्यानंतर 20 वर्षीय बारफिन ओजेकवर तिचा एक्स बॉयफ्रेंड 23 वर्षीय कासिम ओझान सेल्टिकने अॅसिड हल्ला केला होता. कासिमने अॅसिड हल्ल्यापूर्वी मुलीला सांगितले होते, 'जर ती त्याची नाही, तर ती कोणाचीही होऊ शकत नाही'. या घटनेनंतर तिच्या प्रियकराला शिक्षा झाली. नंतर त्याने सतत माफी मागितली. अनेक संदेश दिले. यानंतर बर्फिनने याप्रकरणी तक्रार मागे घेतली.

मुलगी म्हणाली - 'आम्ही प्रेम करतो'

पीडितेने काही वेळाने तिची तक्रार मागे घेण्यास सहमती दर्शवली आणि लिहिले: 'मी चार भिंतींमध्ये राहणे सोयीस्कर नाही. आम्ही एकमेकांना अनेक पत्रे लिहिली आहेत. मी स्वतःला त्याच्या स्वाधीन केले आहे. मी त्याच्यावर खूप प्रेम करते, तो माझ्यावर खूप प्रेम करतो.'

डेली मेलमध्ये प्रसिद्ध झालेल्या बातमीनुसार, कासिमने 2019 मध्ये बर्फिनवर अॅसिड फेकले होते. दोघेही रिलेशनशिपमध्ये होते. दोघांमध्ये ब्रेकअप होताच या तरुणाने तिच्यावर अॅसिड फेकले. या प्रकरणी तरुणाला 13 वर्षे 6 महिन्यांची शिक्षा सुनावण्यात आली होती. मात्र कायद्यातील बदलामुळे त्यांची लवकरच तुरुंगातून सुटका झाली.

तुरुंगातून सुटल्यानंतर, मुलाने ताबडतोब मुलीला प्रपोज केले - आणि मुलीने हा प्रस्ताव स्वीकारला. त्यानंतर लग्नाची तारीख निश्चित झाली आणि या महिन्याच्या सुरुवातीला मुलीने त्याच्याशी लग्न केले.

वडील काय म्हणाले

लग्नाबद्दल बोलताना बर्फिनचे वडील यासर ओझेक म्हणाले, 'त्याने आमच्या नकळत लग्न केले. मी वर्षानुवर्षे संघर्ष केला आणि आता ते सर्व व्यर्थ आहे.

सोशल मीडियावर अशा प्रतिक्रिया उमटल्या

एका यूजरने लिहिले की, माफ केल्याने गुन्हे कमी होत नाहीत. मला वाटतं हे लग्न एक-दोन महिन्यात संपेल. या तरुणीला त्याच तरुणासोबत राहावं लागणार आहे ज्याने तिच्यावर अत्याचार केला होता.

Read More