Marathi News> भारत
Advertisement

कोण होणार महिंद्राचे वारसदार? आनंद महिंद्रांच्या दोन्ही मुलींबद्दल जाणून घ्या?

Anand Mahindra’s Daughters: आनंद महिंद्रा यांच्या दोन्ही मुली कोण आहेत त्या काय करतात याबद्दल जाणून घ्या सविस्तर

कोण होणार महिंद्राचे वारसदार? आनंद महिंद्रांच्या दोन्ही मुलींबद्दल जाणून घ्या?

नवी दिल्लीः महिंद्रा अँड महिंद्राचे चेअरमन उद्योगपती आनंद महिंद्रा हे सोशल मीडियावर फारच अॅक्टिव्ह असतात. त्यांनी केलेल्या अनेक पोस्ट चर्चेचा विषय ठरत असतात, तर, तरुणांमध्येही ते खूपच लोकप्रिय आहेत. त्यांच्या व्यापाराबाबतही ते खूपच सजग आहे. आज आपण आनंद महिंद्रा यांच्या कुटुंबात कोण कोण आहे आणि त्यांची एकूण संपत्ती किती याबाबत जाणून घेऊयात. 

आनंद महिंद्रा त्यांच्या बिझनेसबाबतही सजग आहेत. आनंद महिंद्रा हे नेहमी महिंद्रा कंपनीच्या गाड्याच वापरतात. त्यांच्या म्हणण्यानुसार जर त्यांनी स्वतःनीच त्यांच्या कंपनीची गाडी वापरली नाही तर इतर लोक कसे वापरतील. आनंद महिंद्रा हे 1.9 लाख कोटींची उलाढाल असलेली कंपनी महिंद्रा अँड महिंद्रा ग्रुप सांभाळतात. मात्र, आनंद महिंद्रा यांचे वारसदार कोण आहेत, असा प्रश्न अनेकांना पडतो. ऑटोमोबाइल, अॅग्रीकल्चर, आयटी आणि एअरोस्पेससह अनेक सेक्टरमध्ये महिंद्रा यांचा व्यापार पसरलेला आहे. आनंद महिंद्रा यांना दोन मुली आहेत. मात्र, दोघींपैकी एकाही मुलीने अद्याप कंपनीत लिडरशीप पोझिशनवर नाहीयेत. त्यामुळं लोकांच्या मनात अनेक प्रश्न निर्माण झाले आहेत. 

आनंद महिंद्रा यांच्या दोन मुली आहेत. दिव्या आणि आलिका अशी त्यांची नावे आहेत. त्यांची मुलगी दिव्या हिने न्यू स्कुलमधून बॅचलर डिग्री मिळवली आहे. तर, डिझाइनिंग आणि व्यूअल कम्युनिकेशनमध्ये पदव्युत्तर शिक्षण घेतलं आहे. 2009मध्ये तिने पदवी शिक्षण पूर्ण झाल्यानंतर फ्रीलान्सर म्हणून काम केले आहे. तर 2015मध्ये वर्व मॅगझीनमध्ये काम आर्ट डिरेक्टर म्हणून काम करण्यास सुरुवात केली. 

दिव्या हिने न्यूयॉर्क येथे राहणाऱ्या मॅक्सिन वंशांच्या आर्टिस्ट डॉर्ड जपाटासोबत लग्न केले आहे आणि अमेरिकेतच स्थायिक झाली आहे. तर, दुसरी मुलगी अलिकाने फ्रान्सचा नागरिक असलेल्या तरुणासोबत लग्न केले आहे. आनंद महिंद्रा यांची पत्नी अनुराधा या वर्व मॅगझीनच्या फाउंडर आणि एडिटर आहेत. त्यांनी मोठी मुलगी दिव्या मॅगझीनची क्रिएटिव्ह डायरेक्टर आणि लहान मुलगी आलिका मॅगझीनची एडिटोरियल डायरेक्टर आहे. 

आनंद महिंद्रा यांच्या दोन्ही मुली व्यवसायात का नाहीत?

आनंद महिंद्रा यांना एका मुलाखतीत मुली त्यांच्या व्यवसाय का सांभाळत नाहीत? असा सवाल केला होता. त्यावर त्यांनी म्हटलं आहे की, मुलींना त्यांची आवड स्वतः निवडायची होती. त्यांनी यावेळी एक किस्सा ऐकवला होता. एकदा शेअरहोल्डर मीटिंगमध्ये त्यांना त्यांच्या मुली बिझनेस का सांभाळत नाहीत, असा प्रश्न केला गेला. तेव्हा त्यांनी म्हटलं की माझ्या मुली फॅमिली बिझनेसचा हिस्सा आहेत आणि माझ्या पत्नीसोबत काम करताहेत. त्या महिंद्रा अँड महिंद्राला फॅमिली बिझनेस मानत नाहीत. 

आनंद महिंद्रा यांच्या आजोबांनी देशभक्ती म्हणून 1945 मध्ये कंपनीची सुरुवात केली होती. त्यांनी आपल्या व्यवसायाकडे नेहमीच जनतेच्या पैशाचे रक्षक म्हणून पाहिले. म्हणूनच ते महिंद्रा अँड महिंद्राकडे कौटुंबिक व्यवसाय म्हणून पाहत नाही. त्यांच्या घरात मुले त्यांच्या इच्छेनुसार काम करण्यास मोकळी आहेत, असं त्यांनी म्हटलं आहे. 

Read More