Marathi News> भारत
Advertisement

अयोध्येतील रामलल्लाच्या दर्शनाला जायचंय? किती असेल शुल्क? मंदिरातील प्रवेशाची, आरतीची वेळ सगळं जाणून घ्या

अयोध्येतील राम मंदिराचा प्राण प्रतिष्ठा पूर्ण झाली आता सगळ्यांना वेध लागलेत ते रामलल्लाच्या दर्शनाचे. अशावेळी मंदिरात जाण्यापूर्वी भाविकांना अनेक प्रश्न आहेत. त्या सगळ्या प्रश्नांची उत्तरे जाणून घ्या. 

अयोध्येतील रामलल्लाच्या दर्शनाला जायचंय? किती असेल शुल्क? मंदिरातील प्रवेशाची, आरतीची वेळ सगळं जाणून घ्या

अयोध्येतील राम मंदिरातील प्राण प्रतिष्ठा 22 जानेवारी 2024 रोजी पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या हस्ते पार पडली. यावेळत जगभरातील अनेक मान्यवर व्यक्ती तेथे उपस्थित होते. श्रीराम जन्मभूमी तीर्थ क्षेत्र ट्रस्टनुसार, रामलल्लाच्या प्राण प्रतिष्ठानंतर राम मंदिर भाविकांसाठी खुले असणार आहे. राम मंदिरात भाविक कधी पासून येऊ शकतात? ते दर्शनाचे शुल्क असतील का? आरतीची वेळ काय असेल? या ना अशा अनेक प्रश्नांची उत्तरे यामध्ये मिळतील. 

प्रश्न - कोण सांभाळणार प्रभू श्रीरामाचे मंदिर? 
उत्तर - श्रीराम मंदिरचा सगळा सांभाळ श्रीराम जन्मभूमी तीर्थ क्षेत्र ट्रस्ट करणार आहे. या ट्रस्टची स्थापना सुप्रीम कोर्टाच्या आदेशानंतर केंद्र सरकारने केली आहे. राम मंदिराच्या निर्माणात देशातील नामांकित कंस्ट्रक्शन कंपनी लॉर्सम अँड टूब्रो कंपनी करत आहे. 

प्रश्न- राम मंदिरात आणखी कुणाची प्रतिमा?
अयोध्येतील राम मंदिरातील चार कोपऱ्यात चार देवांचे मंदिर आहेत. ज्यामध्ये शिव, सूर्य, भगवती देवी आणि गणेश मंदिर आहे. यासोबतच अन्नपूर्णा माता आणि हनुमानाचे मंदिर आहे

प्रश्न - राम मंदिरातील आरतीची वेळ काय?
राम मंदिरात रामलल्लाची दिवसातून तीन वेळा आरती होणार आहे. पहिली आरती सकाळी 6 वाजून 30 मिनिटांवर असणार आहे. ज्याला जागरण किंवा श्रृंगार आरती म्हटलं जातं. दुपारी 12 वाजता आरती होणार आहे ज्याला 'भोग आरती' म्हटले जाते. तिसरी आरती ही संध्याकाळी 7 वाजून 30 मिनिटांवर होणार आहे ज्याला 'संध्या आरती' असं म्हटलं जातं. 

प्रश्न - भाविक कधीपासून घेऊ शकतात दर्शन 
22 जानेवारी रोजी प्राण प्रतिष्ठा झाल्यानंतर दुसऱ्या दिवशी म्हणजे 23 जानेवारी रोजी मंगळवारपासून भाविक दर्शन घेऊ शकतात. 

प्रश्न - कोणत्या वेळेत खुले असेल मंदिर?
अयोध्येतील राम मंदिर सकाळी 7 वाजल्यापासून दुपारी 11.30 पर्यंत खुले राहिल. त्यानंतर दुपारी 2 ते संध्याकाळी 7 वाजेपर्यंत भाविकांसाठी दर्शनासाठी खुले असणार आहे. दुपारी अडीच तास भोग आणि विश्रामाकरता मंदिर बंद राहिल. 

प्रश्न - राम मंदिराच्या आरतीमध्ये कसे सहभागी व्हाल? 
अयोध्येतील राम मंदिराच्या आरतीत सहभागी होण्यासाठी श्रीराम मंदिर तीर्थ क्षेत्र ट्रस्टकडून पास घ्यावा लागेल. पासकरिता योग्य वैध्य ओळखपत्राची आवश्यकता आहे. 

प्रश्न - दर्शनासाठी शुल्क भरावा लागेल का? 
अयोध्येतील राम मंदिरात दर्शन निशुल्क आहे. रामलल्लाच्या दर्शनाकरिता कोणतेही पैसे आकारले जात नाही. दिवसातून तीन वेळा होणाऱ्या आरतीला पास मात्र जरुर घ्यावा लागेल. 

प्रश्न - अयोध्येत कसे जाऊ शकतात?
तुम्ही रेल्वे, बस अथवा विमान प्रवास करुन अयोध्येत जाऊ शकता. अयोध्या रेल्वे स्टेशन ते मंदिरातील अंतर अवघे 5 किमी आहे. अयोध्येतील महर्षी वाल्मिकी विमानतळाचे अंतर मंदिरापासून 17 किमी आहे. लखनऊ विमान तळावर उतरून रोड मार्गाने प्रवास करुन अयोध्येला जाऊ शकता. 

Read More