Marathi News> भारत
Advertisement

Viral News : रिअल लाईफ रँचो; कारण 'इथं' Video Call च्या मदतीनं पार पडली महिलेची प्रसूती

Viral News : सोशल मीडिया वरदान की शाप? हा वादाचाच प्रश्न. पण, तुम्ही त्याचा वापर कसा करता हे मात्र तुमच्याच हातात असतं. अशाच सुविधांच्या उपलब्धतेमुळं देशात काय घडलंय पाहिलं?   

Viral News : रिअल लाईफ रँचो; कारण 'इथं' Video Call च्या मदतीनं पार पडली महिलेची प्रसूती

Viral News : (Social Media) सोशल मीडियाच्या उपब्धतेमुळं जग फार जवळ आलं. दूर कुठेतरी असणाऱ्या एखाद्या व्यक्तीसोबत सहज संवाद होऊ लागला. प्रत्येकानं आपआपल्या परीनं इंटरनेट (Internet) आणि सोशल मीडियावरील तंत्रांचा वापर केला. एकाएकी या साऱ्याविषयी बोलण्याचं कारण म्हणजे एक Viral होणारी बातमी. 

तुम्ही 3 idiots हा चित्रपट पाहिलाय का? या चित्रपटात आमिर खान वेब कॅम/ Video Call च्या मदतीनं चक्क महाविद्यालयीन विद्यार्थ्यांच्या वसतीगृहात महिलेची प्रसूती करताना दिसतो. हे दृश्य जरी चित्रपटातील असलं तरी, त्याच्याशी मिळतीजुळती घटना नुकतीच देशात घडलीये. ज्यामुळं अनेकांनाच तो 'रँचो' पुन्हा आठवला आहे. 

कुठे घडली ही घटना? 

ही घटना घडलीये (Jammu Kashmir) जम्मू काश्मीर येथील कुपवाडातील केरन सेक्टरमध्ये येणाऱ्या गावामध्ये. (Loc) नियंत्रण रेषेनजीक असणाऱ्या या गावात गेल्या काही दिवसांपूर्वी शाहीदा हमीद नावाच्या महिलेला मागील आठवड्यात शुक्रवारी सायंकाळच्या सुमारास प्रसूत वेदना होत असल्यामुळं Public Health Centre (PHC) मध्ये आणलं गेलं. 

eclampsia आणि episiotomy अशा अडचणी डॉक्टरांना तिच्यामध्ये स्पष्टपणे दिसत होत्या. अद्ययावत सुविधा असणाऱ्या रुग्णालयात तिला तातडीनं स्थलांतरित केलं जाणं अपेक्षित होतं. पण, जम्मू काश्मीरमधील हवामान (Jammu kashmir climate) इतकं बिघडलेलं की हेसुद्धा शक्य नव्हतं. किंबहुना रुग्णालय प्रशासनानंही किला एअरलिफ्ट करण्याची परवानगी दिली नाही. 

हेसुद्धा वाचा : सादही घालतो लाडका तुला....; 75 वर्षांच्या मुलानं 100 वर्षांच्या बाबांसाठी गायलं गाणं, Video पाहून डोळ्यात येईल पाणी

 

परिणामी तिथं असणाऱ्या डॉक्टरांना पर्यायी मार्ग शोधावा लागला. असं म्हणतात की गरज हीच शोधाची आणि आता आता तर, भन्नाट कल्पनांची जननी असते. इथंही तेच घडलं. स्थानिक रुग्णालयातून स्त्रीरोगतज्ज्ञ (gynaecologist) डॉ. परवेज अहमद यांना VIDEO CALL करण्यात आला आणि संपूर्ण प्रसूती प्रक्रिया या (Video Call) व्हिडीओ कॉलच्या मदतीनं पार पडली. महिलेला प्रसूत कळा येण्यास सुरुवात झाल्यानंतर सहाव्या तासाला तिनं एका गोंडस मुलीला जन्म दिला. रुग्णालयानं दिलेल्या माहितीनुसार आई आणि बाळ या दोघांचीही प्रकृती उत्तम आहे. 

fallbacks

तंत्रज्ञान, समयसूचकता यांच्या बळावर इथं जे काही घडलं ते चित्रपटाच्या दृश्यालाही लाजवेल असंच होतं. नाही का... 

Read More