Marathi News> भारत
Advertisement

ऑनलाईन पैसे ट्रान्सफर करताना IFSC कोड चुकीचा टाकला तर? SBIचे यावर म्हणणे काय?

चुकीचा IFSC कोड टाकल्याने ग्राहकांच्या खात्यातून पैसे कापले जातात, परंतु...

ऑनलाईन पैसे ट्रान्सफर करताना IFSC कोड चुकीचा टाकला तर? SBIचे यावर म्हणणे काय?

मुंबई : स्टेट बँक ऑफ इंडिया ग्राहकांना ऑनलाईन माध्यमातून पैसे ट्रंसफर करण्यावर भर देत आहे. बँकेच्या या पुढाकारानंतर आणि कोरोना व्हायरसच्या संकटानंतर आता लोक ऑनलाइन माध्यमातून खात्यात पैसे ट्रान्सफर करत आहेत. पण, ऑनलाईनद्वारे पैसे ट्रान्सफर करताना, काहीवेळा ग्राहकांकडून काही चुकाही केल्या जातात, ज्यामुळे ग्राहकांना हे थोड जोखमीचं वाटत, त्यामुळे ते ऑनलाईन पेमेंट करण्यासाठी खूप विचार करतात. बऱ्याच वेळा ग्राहक चुकीचा खाते क्रमांक टाकतात किंवा त्यांच्याकडून चुकीचा IFSC कोड टाकला जातो.

चुकीचा IFSC कोड टाकल्याने ग्राहकांच्या खात्यातून पैसे कापले जातात, परंतु लाभार्थीच्या खात्यात ते पोहोचत नाहीत. अशा परिस्थितीत, आज आम्ही तुम्हाला सांगणार आहोत की, तुम्ही पैसे ट्रान्सफर करताना चुकीचा IFSC कोड टाकल्यास काय होते? तसेच, जर तुमच्या खात्यातून पैसे कापले गेले आणि ते समोरच्या व्यक्तीपर्यंत पोहोचले नाही, तर काय करावे? हे देखील तुम्हाला सांगणार आहोत.

वास्तविक, अलीकडेच एका ग्राहकाने ट्विटरद्वारे माहिती दिली आहे आणि म्हटले आहे, 'मी YONO कडून पैसे ट्रान्सफर केले होते ज्यामध्ये IFSC कोड 00 च्या जागी मी oo लिहिले आहे. यामुळे खात्यातून पैसेही कापले गेले आणि माझे पैसे समोरच्याच्या खात्यात देखील आले नाहीत.

यानंतर त्यावर रिप्लाय देत एसबीआयने आपल्या अधिकृत खात्याद्वारे सांगितले की, हे पैसे कसे परत मिळवता येतील.

बँक म्हणाली, "आम्ही शिफारस करतो की, या संदर्भात सहाय्यासाठी तुम्ही तुमच्या शाखेशी संपर्क साधा. कृपया लक्षात घ्या की, जर लाभार्थीचा चुकीचा खाते क्रमांक ग्राहकाने नमूद केला असेल, तर ग्राहकाच्या गृह शाखेने कोणत्याही आर्थिक दायित्वाशिवाय इतर बँकेसह फॉलो-अप प्रक्रिया सुरू केली जाईल. त्यामुळे तुम्हाला तुमच्या बँकेच्या शाखेशी संपर्क करावा लागेल.

चुकीचा खाते क्रमांक टाकला तर?

अनेक वेळा असे घडते की, तुम्ही पैसे ट्रान्सफर करता आणि पुढच्या व्यक्तीच्या खात्यात ते पोहोचत नाही. अशा स्थितीत तुम्हाला आधी तुमची समस्या अर्जाद्वारे सांगावी लागेल आणि तरीही तुमची समस्या सोडवली गेली नाही, तर यासंदर्भाचतील माहिती, 12 अंकी व्यवहार संदर्भ क्रमांक आणि व्यवहाराची तारीख इत्यादी मेल करावा लागेल. यासाठी तुम्ही  support.upi@sbi.co.in वर मेल करू शकता.

चुकीच्या खात्यावर पैसे पाठवले तर काय होते?

बँकेच्या मते, या प्रकरणात बँक जबाबदार नाही. कोणतेही डिजिटल हस्तांतरण करण्यापूर्वी ग्राहकांना लाभार्थीच्या खात्याचे तपशील तपासणे आवश्यक आहे.

परंतु असे असले तरी ग्राहकांची गृह शाखा कोणत्याही जबाबदारीशिवाय इतर बँकांकडे पाठपुरावा करू शकते. या संदर्भात पुढील मदतीसाठी, कृपया आपल्या गृह शाखेशी आणि/किंवा समोरच्या लाभार्थीच्या बँकेशी संपर्क साधावा लागेल.

Read More