Marathi News> भारत
Advertisement

माकपचे ज्येष्ठ नेते श्यामल चक्रवर्ती यांचा कोरोनामुळे निधन

पश्चिम बंगालच्या मुख्यमंत्री ममता बॅनर्जी यांनी त्यांच्या निधनाबद्दल शोक व्यक्त केला 

माकपचे ज्येष्ठ नेते श्यामल चक्रवर्ती यांचा कोरोनामुळे निधन

कोलकाता : पश्चिम बंगालमधील माकपचे ज्येष्ठ नेते श्यामल चक्रवर्ती यांचे वयाच्या 76 व्या वर्षी निधन झाले. कोरोनाची लागण झाल्यानंतर त्यांना 30 जुलै रोजी रुग्णालयात दाखल करण्यात आले होते.

पश्चिम बंगालच्या मुख्यमंत्री ममता बॅनर्जी यांनी त्यांच्या निधनाबद्दल शोक व्यक्त केला आहे. मुख्यमंत्र्यांनी ट्विट केले की, “माजी नेते, माजी खासदार आणि बंगालचे माजी मंत्री श्यामल चक्रवर्ती यांच्या निधनामुळे मी दु:खी आहे. त्यांचे कुटुंबिय, मित्र आणि समर्थकांबद्दल माझी संवेदना व्यक्त करते.'

माकपने ट्विट केले आहे की, "श्यामल चक्रवर्ती यांच्या निधनामुळे पक्ष शोक व्यक्त करत आहे." कॉम्रेड श्यामल हे अनुभवी कामगार संघटनेचे नेते, माजी मंत्री आणि माकपच्या केंद्रीय समितीचे सदस्य होते. आज, कामगार वर्ग आणि डाव्या चळवळीने देशातील एक महत्वाचा आवाज गमावला आहे.'

श्यामल चक्रवर्ती यांनी 1982 ते 1996 या काळात तीनदा परिवहन मंत्री म्हणून काम पाहिले. राज्यसभेचे खासदार म्हणून ते दोनदा निवडून आले. पक्षाच्या एका नेत्याने सांगितले की, श्यामल यांनी आज दुपारी अखेरचा श्वास घेतला. गेल्या अनेक दिवसांपासून ते व्हेंटिलेटरवर होते. त्यांची मुलगी उशसी चक्रवर्ती ही एक अभिनेत्री आहे.

श्यामल चक्रवर्ती हे पश्चिम बंगालमधील कोरोनामुळे निधन झालेले दुसरे नेते आहेत. नुकतेच टीएमसीचे आमदार तमनश घोष यांचेही कोरोनामुळे निधन झाले.

Read More