Marathi News> भारत
Advertisement

आनंद की दु:ख? नववधूला पाहून नक्की का रडू लागला नवरदेव? पाहा व्हिडीओ

आजकालच्या नववधू या फारच खूल्या विचारांच्या आहेत. ज्यामुळे त्या लग्नात न लाजता, न बावरता आपल्या लग्नाचा पुरेपुर आनंद घेतात.

आनंद की दु:ख? नववधूला पाहून नक्की का रडू लागला नवरदेव? पाहा व्हिडीओ

मुंबई : पूर्वीच्या काळातील नववधू आपल्या लग्नात लाजायच्या, लोकांची गर्दी पाहून बावरायच्या परंतु आता जमाना बदलला आहे. आजकालच्या नववधू या फारच खूल्या विचारांच्या आहेत. ज्यामुळे त्या लग्नात न लाजता, न बावरता आपल्या लग्नाचा पुरेपुर आनंद घेतात, त्या नाचतात काय, गाणं काय गातात, त्यांना ज्या गोष्टीनी आनंद मिळतो, त्या सगळ्या गोष्टी नववधू करतात. त्यात सोशल मीडियाची जोड असल्याने आपल्याला लग्नातील काही क्षण देखीस अनुभवायला मिळतात.

लग्नात जेव्हा वधू एन्ट्री करते, तेव्हा लोक तिच्या लूकचे तिच्या कपड्यांचे कौतुक करतात. त्यामुळे नववधूचा लूक पाहून नवरदेवही बहुतेकदा आश्चर्यतकित होऊन नवववधूकडे पाहात स्तब्ध उभा राहतो. परंतु इंटरनेटवर व्हायरल झालेल्या व्हिडीओमध्ये काही खास आहे

हा व्हिडीओ पाहिल्यानंतर लोक एकतर हसायला लागतात किंवा भावनिक होतीक. कारण नववधू जेव्हा स्टेजवर एंट्री घेते. तसा तिला पाहून नवरदेव ढसा-ढसा रडू लागला.

होय, या व्हायरल व्हिडीओमध्ये तुम्ही पाहू शकता की, वर आपली तयारी करुन स्टेजवर नववधूची वाट पाहत उभा असतो, तेवढ्यात समोरुन नववधू हातात वरमाला घेऊन एन्ट्री करते. तेव्हा वधूला पाहून नवरदेव अचानक भावनिक होतो आणि रडू लागतो. त्याला पाहून लग्नाला आलेले पाहुणेही भावूक होतात.

खरेतर पूर्वी लग्नात नववधू स्वत: रडायच्या, परंतु इथे काही तरी उलटचं चित्र पाहायला मिळतंय. इथे चक्क नवरदेवच रडू लागला आहे.

 
 
 
 
 
 
 
 
 
 
 
 
 
 

 

वराला रडताना पाहून वधूच्याही डोळ्यात अश्रू

रिचा वर्मा नावाच्या इन्स्टाग्राम अकाऊंटवरुन हा व्हिडीओवर शेअर केला आहे. हा व्हिडीओ शेअर करताना त्याच्या कॅप्शनमध्ये लिहिले, 'मी त्याला रडण्यास मनाई केली होती, पण जो व्यक्ती चित्रपट पाहिल्यानंतर देखील रडू लागतो, त्याला लग्नात आपले आश्रू आवरले नाहीत. ते पाहून मी देखील रडू लागले आणि मी भावूक झाले. असे वाटले की, माझे स्वप्न पूर्ण झाले आहे आणि मी माझे आनंदाश्रू रोखू शकलो नाही. या कॅप्शनसह #10yearsoftogetherness असे कॅप्शन देखील टाकले गेले आहे.

Read More