Marathi News> भारत
Advertisement

बाबो! नवरीला पाहताच नवरदेवाच्या मित्रमंडळींचा तोल डगमगला आणि....

त्यांची अशी अवस्था झाली की... 

बाबो!  नवरीला पाहताच नवरदेवाच्या मित्रमंडळींचा तोल डगमगला आणि....

मुंबई : सोशल मीडियावर दर दिवशी शेकड्यानं व्हिडीओ व्हायरल होत असतात. व्हिडीओ आणि त्यामध्ये दिसणारे, त्या माध्यमातून हाताळले जाणारे अनेक विषय नेटकऱ्यांच्या पसंतीस उतरतात. 

इन्स्टाग्रामवर प्रवासामागोमाग जर कोणत्या व्हिडीओंना पसंती मिळाली असेल, तर ती म्हणजे लग्नसमारंभांच्या व्हिडीओंना. नवरदेव आणि नवरीचा हटके स्वॅग असो किंवा मग पाहुण्यामंडळींनी केलेली धमाल असो. कोणतंही नातं नसताना, अनेकदा अनोखळी व्यक्तीचा विवाहसोहळाही याच सोशल मीडियामुळं आपलासा वाटू लागतो. 

सध्या असाच एक व्हिडीओ सर्वांच्या आकर्षणाचा विषय ठरत आहे. कारणं, व्हिडीओ पाहतानाच लक्षात येत आहे. ज्यामध्ये नवरी तिच्या सुरेख अशा रुपात साजश्रृंगारासह पाठमोऱ्या उभ्या असणाऱ्या नवरेदावचे मित्र आणि भावंडांच्या मागे येऊन उभी राहते. आणि ही मंडळी काही क्षणांतच तिला पाहण्यासाठी वळतात. 

 
 
 
 
 
 
 
 
 
 
 
 
 
 
 

A post shared by ShaadiSaga.com (@shaadisaga)

बस्स.... मग काय, नवरीला पाहिल्यानंतर नवरदेवाच्या आधीच ही मंडळी अशी काही घायाळ होतात की बस रे बस. कुणाचा तोल जातो, तर कुणी तिच्याकडे एकटच पाहत राहतं. शेवटी ते सर्वजण येऊन या नवरीला मिठी मारतात. अतिशय खेळीमेळीच्या वातावरणात चित्रीत करण्यात आलेला हा व्हिडीओ पाहताना पाहणाऱ्यांच्याही चेहऱ्यावर नकळतच स्मितहास्य उमटत आहे. 

Read More