Marathi News> भारत
Advertisement

VIDEO : रक्त गोठवणाऱ्या थंडीत जवानांचा मार्शल आर्ट्सचा सराव

शत्रूचा मारा परतवून लावताना शस्त्रांची मदत होतेच. पण...

VIDEO : रक्त गोठवणाऱ्या थंडीत जवानांचा मार्शल आर्ट्सचा सराव

उत्तराखंड : भारताच्या सीमेचं संरक्षण करण्यासाठी चोवीस तास डोळ्यांच्या पापण्या न मिटता सैन्यदलातील जवान आपलं योगदान देत असतात. ऊन, वारा, पाऊस किंवा मग बदलतं ऋतूचक्र या कोणत्याही परिस्थितीचा सामना करण्याचं सामर्थ्य ते दाखवतात. दैनंदिन जीवनात आपल्याला मनमुरादपणे जगता येत आहे, यासाठी खऱ्या अर्थाने सीमेवर तैनात असणाऱ्या प्रत्येक जवानाचे आभार मानू तितकं कमीच आहे. 

प्रजासत्ताक दिनाच्या निमित्ताने देशातील जनतेने शक्य त्या सर्व परिंनी या जवानांच्या कर्तृत्वाला सलाम करत त्यांच्याप्रती कृतज्ञतेची भावना व्यक्त केली. त्यातच आता एएनआय या वृत्तसंस्थेने सीमेवर तैनात असणाऱ्या जवानांचा एक व्हिडिओ पोस्ट केला आहे. या व्हिडिओमध्ये शारीरिक सुदृढता कायम राखण्यासाठी जवान कशा प्रकारे कवायती आणि नियमित व्यायामाचा सराव करतात हे पाहायला मिळत आहे. 

उत्तराखंड येथे स्थित औली या ठिकाणी इंडो- तिबेटीयन अर्थात भारत- तिबेट सीमारेषेवरील जवान कवायती करतानाचा हा व्हिडिओ पाहता अंगावर काटा येत आहे. ज्यामध्ये ते मार्शल आर्ट्सचा सराव करताना दिसत आहेत. शत्रूचा मारा परतवून लावताना शस्त्रांची मदत होतेच. पण, त्यासोबतच युद्धनीतीनध्ये स्वयंसंरक्षणाच्या काही अशा तंत्रांचाही समावेश असतो, जो बऱ्याचदा फायद्याचा ठरतो. हेच तंत्र अवगत करत त्यात प्राविण्य मिळवण्यासाठी म्हणून हा सराव सुरू असल्याचं कळत आहे. त्यामुळे रक्त गोठवणाऱ्या थंडीत, बर्फाच्छादित प्रदेशात अनेक आव्हानांना तोंड देत हे सर्वच जवान कर्तव्यदक्षता राखत देशसेवा करतात याचाच प्रत्यय हा व्हिडिओ करुन देत आहे, असंच म्हणावं लागेल. 

Read More