Marathi News> भारत
Advertisement

भक्ती तिथे शक्ती! वैष्णो देवीपर्यंतच्या सायकल प्रवासाला निघाल्या 'या' मराठमोळ्या आजी

  Navratrotsav 2020 नवरात्रोत्सवादरम्यान आदिशक्तीचा जागर करत या अद्वितीय उर्जास्तोताची भक्तीभावे आराधना केली जाते. मुळात दैनंदिन आयुष्यातही स्त्रीला असाच मान मिळावा यासाठीच सारे आग्रही. असाच हा विचार आणि एक भन्नाट व्हिडिओ ट्विटरवर सध्या अनेकांचं लक्ष वेधत आहे. या व्हिडिओमध्ये एक आजीबाई चक्क २२०० किलोमीटरचा प्रवास करत त्यांच्या सायकलवरुन वैष्णो देवीच्या रोखानं प्रवास करत असल्याचं पाहायला मिळत आहे. 

भक्ती तिथे शक्ती! वैष्णो देवीपर्यंतच्या सायकल प्रवासाला निघाल्या 'या' मराठमोळ्या आजी

मुंबई :  Navratrotsav 2020 नवरात्रोत्सवादरम्यान आदिशक्तीचा जागर करत या अद्वितीय उर्जास्तोताची भक्तीभावे आराधना केली जाते. मुळात दैनंदिन आयुष्यातही स्त्रीला असाच मान मिळावा यासाठीच सारे आग्रही. असाच हा विचार आणि एक भन्नाट व्हिडिओ ट्विटरवर सध्या अनेकांचं लक्ष वेधत आहे. या व्हिडिओमध्ये एक आजीबाई चक्क २२०० किलोमीटरचा प्रवास करत त्यांच्या सायकलवरुन वैष्णो देवीच्या रोखानं प्रवास करत असल्याचं पाहायला मिळत आहे. 

अतिशय सुरेख अशा सकारात्मक उर्जेनं आणि तितक्याच कमालीच्या आत्मविश्वासानं प्रवासाला निघालेल्या या आजींना पाहून त्यांच्या व्हिडिओ चित्रीत करणाऱ्यांनाही आश्चर्याचा धक्काच बसला आहे. 

महाराष्ट्रातील बुलढाणा येथील या महिला असल्याची माहिती समोर येत आहे. सायकलवरुन हजारो किलोमीटरचा प्रवास करण्यासाठी निघालेल्या या आजींचा उत्साह भल्याभल्यांना लाजवेल असाच आहे. इतकंच नव्हे, तर स्त्रीशक्तीचं एक वेगळंच रुप पाहण्याची संधी मिळाल्याची प्रतिक्रिया अनेकांनी दिली आहे. नारीशक्तीचा जागर साऱ्या देशात आणि विश्वात सुरु असतानाच सोशल मीडियावर हा व्हिडिओ सर्वांच्या भेटीला येणं म्हणजे एक अनोखा योगच. 

 

भक्ती तिथे शक्ती, असं अनेकदा आपण ऐकलं असेल. पण, वैष्णो देवीच्या रोखानं प्रवासाला निघालेल्या या आजींना पाहिल्यानंतर त्याचीच अनुभूतीही येत आहे असं म्हणायला हरकत नाही. 

 

Read More