Marathi News> भारत
Advertisement

Watch: सीसीटीव्हीत कैद झाला थरकाप उडविणारा अपघात

आतापर्यंत तुम्ही अपघाताचे अनेक व्हिडिओज पाहिले असतील. मात्र, आता असा एक व्हिडिओ समोर आला आहे जो पाहिल्यानंतर तुम्हालाही आश्चर्याचा धक्का बसेल.

Watch: सीसीटीव्हीत कैद झाला थरकाप उडविणारा अपघात

नवी दिल्ली : आतापर्यंत तुम्ही अपघाताचे अनेक व्हिडिओज पाहिले असतील. मात्र, आता असा एक व्हिडिओ समोर आला आहे जो पाहिल्यानंतर तुम्हालाही आश्चर्याचा धक्का बसेल.

(व्हिडिओ पाहण्यासाठी खाली स्क्रोल करा)

अपघाताचा हा व्हिडिओ गुजरातमधील मोरबी येथील आहे. एक कार पेट्रोल पंप जवळून जात होती त्याच दरम्यान वाहनचालकाचं गाडीवरचं नियंत्रण सुटतं. नियंत्रण सुटल्यामुळे वेगाने आलेली गाडी डिव्हायडरला धडकते आणि उलटते.

संपूर्ण घटना सीसीटीव्हीत कैद

ही संपूर्ण घटना सीसीटीव्हीत कैद झाली आहे. हा व्हिडिओ पाहून असं वाटतं की, एखादा मुलगा रिमोटची गाडी खेळत आहे आणि त्या गाडीचा अपघात होतो.

सिनेमातील दृश्य नाही तर...

विश्वास बसत नाहीये ना? पण असचं या सीसीटीव्ही फूटेजवरुन दिसत आहे. असं दृश्य तुम्ही एखाद्या सिनेमात पाहिलं असेल. मात्र, आता असं प्रत्यक्षात घडलं आहे.

या गाडीत दोन व्यक्ती होते. सुदैवाने दोघेही सुरक्षित गाडीतून बाहेर निघतात.

न्यूज एजन्सी एएनआयने या अपघाताचा सीसीटीव्ही व्हिडिओ प्रसारीत केला आहे.

Read More