Marathi News> भारत
Advertisement

तुम्ही वॉशिंग मशीनमध्ये कसे कपडे धुताय? योग्य पद्धत तुम्हाला माहितीये का?

कपडे वॉशिंग मशीनमध्ये धुताना कोणती काळजी घेतली पाहिजे.

तुम्ही वॉशिंग मशीनमध्ये कसे कपडे धुताय? योग्य पद्धत तुम्हाला माहितीये का?

मुंबई : सध्या आपण सर्वजण वॉशिंग मशीनमध्ये कपडे धुवायला टाकतो. मात्र अनेकांना वॉशन मशीनमध्ये कपडे धुण्याची योग्य पद्धत माहित नसते. चुकीच्या  धुवायला टाकले तर मशीनला नुकसान होऊ शकतं. सोबतच कपडेही चांगले धुवून निघत नाहीत. अनेकदा कपड्यांवर साबण तसाच राहतो आणि कपडे पुन्हा बादलीत बुचकळून धुवावे लागतात. अशात कपडे वॉशिंग मशीनमध्ये धुताना कोणती काळजी घेतली पाहिजे. वॉशिंग मशीनमध्ये कपडे धुण्याची योग्य पद्धत काय? जाणून घेऊया. याने तुमचे कपडेही स्वच्छ  निघतील आणि मशिनही खराब होणार नाही. 

मशीनमध्ये कपडे धुण्याची योग्य पद्धत : 

कपड्यांप्रमाणे करा मशीनची सेटिंग 

मशीनमध्ये सर्व प्रकारचे कपडे एकत्र धुण्याऐवजी कपड्यांचं वर्गीकरण करा. कमी मळलेले कपडे एकीकडे आणि जास्त मळलेले कपडे वेगवेगळे करून घ्या. यानंतर मशीनची सेंटिंग अत्यंत महत्त्वाची आहे. कपड्यांप्रमाणे मशीनची सेटिंग करावी. कमी मळलेले कपडे  जास्त वेळ मशीनमधे लावाल तर कपडे फाटण्याची शक्यता जास्त असते. म्हणून कमी मळलेल्या कपड्यांसाठी कमी वेळ सेट करा. कमी मळलेल्या कपड्यांसाठी साबणाची कमी टाका, जास्त साबणाने कपड्यांच्या रंगावर परिणाम होऊ शकतो. जास्त मळलेल्या कपड्याने आधी पाण्यात भिजवून ठेवा, त्यानंतर मशीनमध्ये धुतल्यास कपडे चांगले निघतात. यावेळी तुम्ही जरा जास्त साबण वापरू शकतात. अनेक मशीन्समध्ये 'सोकिंग' ऑप्शन उपलब्ध असतो.  

मशीनमध्ये पाणी भरून घेणं चांगलं

मशीनमध्ये आधी पाणी भरून त्यामध्ये डिटर्जंट टाकणे योग्य ठरते. कारण आधी कपडे आणि त्यावर तुम्ही साबण टाकलात तर साबण कपड्यांच्या कोपऱ्यात अडकू शकतो. यामुळे कपड्यांना साबणाचे डाग लागू शकतात. फ्रंट लोड मशीनमध्ये तुम्ही असं करू शकत नाहीत. 

कोमट पाणी वापरणे 

मशीनमध्ये जर जास्त कपडे असतील तर तुम्ही कोमट पाण्याचा वापर करू शकतात. कोमट पाण्याच्या वापराने कपडे अधिक स्वच्छ धुवून निघतात. अनेक मशीनमध्ये गरम पाण्याचा ऑप्शन असतो. कोमट पाण्यात जराशी बेकिंग पावडर टाकल्यास कपड्यांवरील डाग निघण्यास मदत होते. 

कपडे सुकवताना घ्या अशी काळजी 

मशीनमध्ये कपडे धुतल्यानंतर आधी कपडे वेगवेगळे करून घ्या. याने कपड्यांवर कमी प्रमाणात सुरकुत्या पडतात. मशीनमध्ये कपडे सुकवतना एकदा फक्त पाण्यात कपडे विसळून मग मशीनमध्ये फिरवा. याने अतिरिक्त साबण निघून जाण्यास मदत होते. कपडे थेट उन्हात वाळत घालू नका. यानेही कपड्यांच्या रंगांवर परिणाम होतो.

Read More