Marathi News> भारत
Advertisement

Go Air पाठोपाठ Vistara ने 75% नी स्वस्त केली विमानतिकीट

अवघ्या काही तासात मान्सूनचं आगमन होणार आहे.

Go  Air पाठोपाठ Vistara ने 75% नी स्वस्त केली विमानतिकीट

 मुंबई : अवघ्या काही तासात मान्सूनचं आगमन होणार आहे. पावसाळा सुरू झाला की विकेंड पिकनीकचे बेत बनतात. अशात तुम्ही विकेंड पिकनीक प्लॅन करत असाल तर विमानदर स्वसत जहल्याने आता ही ट्रीप देशांतर्गत होऊ शकते. 
 
 Go  Air  पाठोपाठ आता विस्तारा विमानकंपनीनेदेखील नवी ऑफर आणली आहे. त्यानुसार विमानप्रवासाचे दर 75% कमी केले आहे. 21 जून  ते 27 सप्टेंबर दरम्यान विमानप्रवासासाठी ही ऑफर खुली ठेवण्यात आली आहे. सामान्य विमानप्रवास दरांपेक्षा या विमानप्रवासाच्या तिकिटींची किंमत 75% कमी करण्यात आली आहे.  गोएअरची नवी 'मान्सून सेल' ऑफर जाहीर

काय असतील दर ? 

शॉर्ट डिस्टंट विमानप्रवासाठी तिकीटाचे दर 1599 इतके कमी आहेत. 

दिल्ली - लखनऊ -  1599 रूपये  
दिल्ली रांची - 2199
दिल्ली - कोलकत्ता - 2299
दिल्ली मुंबई - 2299 
दिल्ली -गोवा 2799
कोलकत्ता - पोर्टब्लेअर 2499 

मंगळवार रात्रीपासून हा स्वस्त दरातील विमानप्रवासाची तिकीट बुकिंग करणं शक्य आहे.  

Read More