Marathi News> भारत
Advertisement

Video Viral: खतरनाक ! डान्स करताना घडलं विपरीत... अचानक छतालाच लटकली 'ही' तरुणी

Viral Video of Girl Dancing: सध्या नाना प्रकारचे व्हिडीओज सोशल मीडियावर व्हायरल असतात. त्यात सध्या असाच एक व्हिडीओ सोशल मीडियावर नुसता धुमाकूळ घालत आहे. त्यामुळे या फनी व्हिडीओची सध्या सगळीकडेच तुफान चर्चा होते आहे, तुम्ही पाहिलात का हा व्हिडीओ?

Video Viral: खतरनाक ! डान्स करताना घडलं विपरीत... अचानक छतालाच लटकली 'ही' तरुणी

Viral Video of Girl Dancing: सध्या जमाना आहे तो म्हणजे व्हिडीओचा. सोशल मीडियावर सध्या नानातऱ्हेच्या व्हिडीओंची (viral video on social media) चलती आहे त्यामुळे आपल्यालाही असे व्हिडीओ पाहून कधी हसायला येतं, रडायला येतं नाहीतर भिती वाटते. सध्या असाच एक व्हिडीओ सोशल मीडियावर तूफान व्हायरल होतो आहे. हा व्हिडीओ (girl dancing horror video) पाहून भल्याभल्यांची झोप उडाली आहे. या व्हिडीओत एक तरूणी अचानक नाच करता करता कपाटावर चढते आणि कपाटावर जाऊन थेट छतावर लटकायचाच (girl hanging on ceiling goes viral) प्रयत्न करते. तुम्हाला हा व्हिडीओ पाहून दोन मिनिटं आश्चर्याचा धक्काच बसेल परंतु हा व्हिडीओ ट्रेडिंग ठरला आहे. हा व्हिडीओच्या कॅप्शनमध्ये नाच करणाऱ्या या मुलीचा व्हिडीओ पाहून ही कोणाची बेस्ट फ्रेंड आहे, गमतीशीर वाक्य टाकलं आहे. हा व्हिडीओ सध्या सगळीकडे वेड्यासारखा व्हायरल होतो आहे. (viral video while dancing girl hanging on the roof what happended next will leave you shocked)

हा व्हिडीओ इन्टाग्रामवर (instagram) सध्या व्हायरल होतो आहे. या व्हायरल होणाऱ्या व्हिडीओत मुलगी खरंच भूतासारखी छताला लटकल्याचं नेटकऱ्यांना जाणवतं आहे. परंतु हे काही भूत नाही. ही मुलगी सुरूवातीला वेड्यासारखी डान्स करताना दिसत आहे, त्यानंतर अचानक ती कपाटावर जाऊन चढते आणि मग कपाटावर असलेल्या छताला जाऊन लटकते. लटकलेल्या अवस्थेत असतानाही ही मुलगी गोल गोल फिरतानाही दिसते आहेत आणि त्यानंतर परत ती विचित्र डान्स (girl dancing funny video) करताना दिसते आहे. या व्हिडीओत या मुलीचा अतरंगी डान्स पाहून काही नेटकरी घाबरले आहेत तर काहीजण तिच्या या विचित्र डान्सवर खो खो हसत आहेत. त्यामुळे या व्हिडीओची सध्या एकच चर्चा सुरू झाली आहे. 

हा व्हिडीओ पाहून काहींना यात ऍनिमेशन केल्याचं जाणवतं आहे तर काहींना यात व्हिएफएक्स केल्याचं जाणवतं आहे. तर काही लोकं हा व्हिडीओ फास्ट फॉरवर्ड केल्याचं दिसते आहे. परंतु यावर केलेलं एडिटींग काहीही असलं तरी सध्या या व्हिडीओवर सगळीकडे तूफान हास्याचा फवारा उडाला आहे. या व्हिडीओ पाहून आणि मुलीचा डान्स पाहून हिच्या काय भूत संचारलं आहे का असं म्हणत आहेत तर काही जण हिला वेड लागलं असल्याचं म्हणतं आहेत. जमिनीवर उडी मारल्यानंतरही ही मुलगी विचित्र पद्धतीनं डान्स करताना दिसते आहे. त्यामुळे एकच हशा उडाला आहे. यावर व्हिडीओवर अनेक लोकं हटके कमेंट्सही करत आहेत. एकानं हा व्हिडीओ पाहून असं म्हटलं आहे की, हे व्हिएफएक्सचं (vfx) भूत आहे का भूताची सावली. 

हेही वाचा - Sonam Kapoor's Son Latest Photo: कितीही लपवलं तरी अखेर चाहत्यांना दिसली Sonam च्या बाळाची पहिली झलक...

दुसऱ्या एका युझर्सनं असं लिहिलं आहे की, ताईला हा कोणता आजार जडला आहे तर तिसऱ्यानं लिहिलंय की, माझं मित्रंही असे नाच करायचे मग त्यांना माकड घेऊन गेले. vikash___raj_01 या नावाच्या युजरनं हा व्हिडीओ शेअर केला आहे. या व्हिडीओला आत्तापर्यंत लाखो लाईक्स आलेले आहेत. 

 
 
 
 
 
 
 
 
 
 
 
 
 
 
 

 

त्यामुळे हा व्हिडीओ पाहताना तुम्हीही सावधगिरी बाळगायला हवी. कारण हा व्हिडीओ गमतीत केला असला तरी त्या व्हिडीओप्रमाणे स्टंटबाजी करणं तुमच्या पथ्यावर पडू शकतं. 

Read More