Marathi News> भारत
Advertisement

लखपती भिकारीचा स्वॅग्च वेगळा, पैशांचा पाऊस पाडू शकतो इतकी संपत्ती; पाहा व्हिडीओ

सोशल मीडियावर आपल्याला बरेच असे व्हिडीओ पाहायला मिळतात जे आश्चर्यकारक असतात.

लखपती भिकारीचा स्वॅग्च वेगळा, पैशांचा पाऊस पाडू शकतो इतकी संपत्ती; पाहा व्हिडीओ

मुंबई : सोशल मीडियावर आपल्याला बरेच असे व्हिडीओ पाहायला मिळतात जे आश्चर्यकारक असतात. सध्या सोशल मीडियावर असाच एक व्हिडीओ व्हायरल होत आहे. जो पाहून तुम्हाला ही धक्का बसेल. सध्या हा व्हिडीओ सर्वत्र धुमाकुळ घालत आहे. हा व्हिडीओ एका वृद्ध भिकाऱ्याशी संबंधित आहे. ज्याला कोणत्या तरी गोष्टीचा राग आल्यामुळे त्याने आपल्याकडील पैशांना सर्वत्र फेकले आहे. एवढेच काय तर त्याने त्याच्याकडील मालमत्तेचे कागदपत्र हवेत उडवले.

काही वेळातच हा व्हिडिओ हजारो वेळा पाहिला गेला आहे आणि नेटिझन्सही त्यावर जोरदार कमेंट करत आहेत. तुम्हाला हा व्हिडीओ पाहून आश्चर्यवाटेल परंतु हा व्यक्तीकडे शे-दोनशे पैसे नाही हजारो रुपये त्याने जमिनीवरती फेकले होते.

व्हिडीओमध्ये दिसत आहे की, हा वृद्ध एका ठिकाणी बसला आहेत आणि त्याने आपल्याकडील सर्व नोटा हवेत उडवून दिल्या आहेत. हा व्यक्ती कोणावर तरी संतापून आपल्याकडे पैसे दाखवत आहे. तो आपल्या नावावरील संपती सुद्धा दाखवत आहे.

 
 
 
 
 
 
 
 
 
 
 
 
 
 
 

 

नोटांमध्ये दहा, पन्नास आणि शंभरच्या नोटा स्पष्ट दिसत आहेत. सोशल मीडियावर व्हिडिओ अपलोड करून एका यूजरने नागदा रेल्वे स्टेशनजवळ ही घटना घडल्याचे सांगितले आहे. त्याच्याकडे असलेल्या मालमत्तेची कागदपत्रे पाहून लोकांनाही आश्चर्य वाटले.

आपण आयुष्यभर पैसे कमाऊन सुद्धा आपल्याकडे इतके पैसे नाहीत. परंतु या व्यक्तीने ते कसं कमावले असाच प्रश्न अनेकांना पडला आहे.

Read More