Marathi News> भारत
Advertisement

'How dare you..' प्रवाशाने विमानात लेकीला स्पर्श केला म्हणून वडिलांचा राग अनावर, Video Viral

Vistara Flight : विमानातील अजून एक व्हिडीओ व्हायरल झाला आहे. प्रवाशाने लेकीला स्पर्श केला तेव्हा वडिलांचा राग अनावर झाला. त्यानंतर तूतू मैं मैंचा हा व्हिडीओ व्हायरल झाला आहे. 

'How dare you..' प्रवाशाने विमानात लेकीला स्पर्श केला म्हणून वडिलांचा राग अनावर, Video Viral

Viral Video : आज वर्षाची सुरुवातच विमानातील कांडच्या व्हिडीओने झाली आहे. एअर इंडियाच्या विमानात प्रवाशाने लघुशंका केली अन् त्यानंतर एकच वाद सुरु झाला. या घटनेनंतर विमानातील अनेक धक्कादायक घटना आणि त्याचे व्हिडीओ सोशल मीडियावर व्हायरल झाले. प्रवाशी आणि विमानातील हवाई सुंदर म्हणजे एअर एअर होस्टेसमधील वादावादी असो किंवा विमानाच्या पायलटशी झालेली भांडणाचे व्हिडीओ असोत. (Flight Incident Viral Video)

वडिलांचा राग अनावर!

विमानातील अजून एक धक्कादायक व्हिडीओ समोर आला आहे. या व्हिडीओमध्ये एक व्यक्ती खूप आरडाओरड करताना दिसत आहे. कारण कळल्यास तुमच्याही राग अनावर होईल. विमानातील ही तूतू मैं मैं सध्या सोशल मीडियावर व्हायरल झाली आहे.  विस्तारा (Vistara Flight)फ्लाईटमधील या व्हिडीओमधील व्यक्तीला हवाई सुंदरी शांत करताना दिसतं आहे. (Vistara Flight Incident Viral Video)

रागाचं कारण की...

झालं असं की, फ्लाइटमध्ये मुलगी आणि वडील वेगवेगळ्या रांगातील सीटवर बसले आहेत. अचानक त्यांचा लक्षात आलं. लेकीच्या शेजारी असलेल्या व्यक्तीने तिला चुकीच्या पद्धतीने स्पर्श केला. त्यामुळे वडिलांचा राग डोक्यात गेला. त्यांनी त्या व्यक्तीला खरीखोटी सुनावली. तुझी हिम्मत कशी झाली, असं म्हणत त्यांने आपल्या मुलीला हात लावणाऱ्या व्यक्तीला सुनावलं. (viral video Man blasts passenger who allegedly touched his daughter on Vistara Mumbai Delhi flight Trending Video on Social media google trend news )

हेसुद्धा वाचा - Viral Video : कोण आहे ही तरुणी? Kedarnath Dham मध्ये बॉयफ्रेंडला प्रपोज केलं अन् मग...


त्यांना शांत करण्यासाठी आलेल्या फ्लाइट अटेंडंटशीही त्यांचा जोरदार वाद झाला. अगदी या संतापलेल्या वडिलांनी फ्लाइट क्रूलाही शिवीगाळ केली. गेल्या काही महिन्यांपासून विमानातील धक्कादायक घटनांमध्ये वाढ झाली आहे.

ही घटना मुंबईतून डेराडून व्हाया दिल्ली या विस्तारा फ्लाइटमध्ये झाल्याचं बोलं जातं आहे.  हा व्हिडीओ Men's Rights Professionals या ट्वीटर अकाऊंटवर शेअर करण्यात आला आहे. 

 

Read More