Marathi News> भारत
Advertisement

बायको व्यायाम करत नाही म्हणून नवऱ्याचा विचित्र जुगाड; व्हिडिओ पाहल्यावर पोट धरून हसाल

एका नवरा बायकोचा भन्नाट व्हिडिओ समोर वायरल होत आहे

बायको व्यायाम करत नाही म्हणून नवऱ्याचा विचित्र जुगाड; व्हिडिओ पाहल्यावर पोट धरून हसाल

मुंबई : डिजिटल जगात काय वायरल होईल ते सांगता येत नाही. असाच एका नवरा बायकोचा भन्नाट व्हिडिओ समोर वायरल होत आहे. आपण फीट राहावं असं प्रत्येकाला वाटतं. परंतु प्रत्येकालाच व्यायाम करायला आवडतं असं नाही. काही लोकं व्यायाम म्हटलं की नाक मुरडतात. असाच हा व्हिडिओ सोशल मीडियावर वायरल होत आहे.

एक व्यक्ती आपल्या बायकोला व्यायाम करण्यासाठी प्रोत्साहन देत आहे. तो तिने व्यायाम करावा यासाठी खूप मेहनत घेतोय. परंतु ती व्यायाम करण्याचा कंटाळा करतेय. 

परंतु त्यानंतर नवऱ्याने जो जुगाड केला तो पाहून तुम्ही भरपूर हसाल. नवऱ्याने आपल्या तोंडात काही नोटा ठेवल्या. त्यांनंतर बायकोला त्या घ्यायला सांगितल्या. तिने खरंच त्या नोटा घेण्याच्या निमित्ताने व्यायाम केला. सोशल मीडियावर हा व्हिडिओ असंख्य लोकांनी शेअर आणि लाईक केला आहे

Read More