Marathi News> भारत
Advertisement

वधू किंवा गर्लफ्रेंड नाही तर नवरदेवासोबत घोडीनं ठोकली धूम, वऱ्हाडी पाहातच राहिले

गर्लफ्रेंड किंवा वधू नाही तर चक्क घोडीच नवरेदवाला घेऊन पळाली... वऱ्हाडी पाहातच राहिले लग्नमंडपात नेमकं काय घडलं पाहा व्हिडीओ

वधू किंवा गर्लफ्रेंड नाही तर नवरदेवासोबत घोडीनं ठोकली धूम, वऱ्हाडी पाहातच राहिले

नवी दिल्ली : लग्नाच्या मंडपात अनेक गमती-जमती होत असतात. बऱ्याचदा मित्र-मंडळी अनेक मस्करी करत असतात. लग्नाच्या मंडपात अनेकदा अडचणींचाही सामना करावा लागत असतो. लग्नाचा सिझन सध्या सगळीकडे आहे. नुसतं सोशल मीडिया उघडलं की फोटो आणि व्हिडीओचा भडीमार सुरू आहे. मात्र या सगळ्यात चर्चा आहे ती एक व्हिडीओची यामागे कारणही रंजक आहे. 

लग्नाच्या मंडपातून चक्क वधू किंवा गर्लफ्रेंड किंवा पोलीस नाही तर चक्क घोडीच नवरदेवाला घेऊन पळाली आहे. या घोडीनं नवरदेवाला पळवलं आणि वऱ्हाडीही आश्चर्याने पाहात राहिले. तिथल्या वऱ्हाडींनाही तिला अडवणं अशक्य झालं. या संपूर्ण घटनेचा व्हिडीओ सोशल मीडियावर तुफान व्हायरल होत आहे. 

नवरदेवर घोडीवर बसून वऱ्हाडींसोबत लग्नाच्या मंडपात पोहोचला. त्याच वेळी फटाका फोडल्यासारखा आवाज झाला. त्यामुळे घोडी बिथरली. तिने लग्नमंडपातून थेट पळ काढला. यावेळी ती नवरदेवालाही सोबत घेऊन पळाली. 

या घटनेमुळे सर्वांची तारांबळ उडाली. तर जमलेली मंडळी हा काय प्रकार असं पाहातच राहिली. हा व्हिडीओ सोशल मीडियावर वेगानं व्हायरल होत आहे. या व्हिडीओवर लोकांनीही मजेशीर कमेंट्स केल्या आहेत. मात्र अशा प्रकारच्या घटना कधीकधी जीवावरही बेतू शकतात. त्यामुळे असे प्रकार करणं टाळावं असंही काही युजर्सनी म्हटलं आहे. 

Read More