Marathi News> भारत
Advertisement

Reel युगातील Parenting! शिक्षकदिनी 'आज की रात' वर थिरकली चिमुकली; डान्स पाहून नेटकरी संतापले

Viral Dance Video : सोशल मीडियावर तमन्ना भाटियाच्या आयटम साँगवर एक चिमुकली डान्स करताना दिसत आहे. हा व्हिडीओ सोशल मीडियावर व्हायरल झाला असून नेटकऱ्यांनी पालकत्वावर प्रश्नचिन्ह उपस्थितीत केलाय. 

Reel युगातील Parenting! शिक्षकदिनी 'आज की रात' वर थिरकली चिमुकली; डान्स पाहून नेटकरी संतापले

Viral Dance Video : सोशल मीडियावर असंख्य व्हिडीओ व्हायरल होत असतात. फार कमी व्हिडीओ हे नेटकऱ्यांचं लक्ष वेधण्यात यशस्वी होतात. सोशल मीडियावर लहान मुलांचे व्हिडीओ मोठ्या प्रमाणात पाहिले जातात. लहान मुलांचे निरागस खोडकर व्हिडीओ पाहून मनं कसं प्रसन्न होतं. सोशल मीडियावर एका चिमुकलीचा व्हिडीओ तुफान व्हायरल झाला आहे. या व्हिडीओमध्ये चिमुकली डान्स करताना दिसत आहेत. 

खरं तर या चिमुकलीने खूप छान डान्स केला आहे. पण या व्हिडीओवर नेटकऱ्यांनी आक्षेप घेतलाय. झालं असं की, या चिमुकलीने शिक्षक दिनी 'स्त्री 2' चित्रपटातील तमन्ना भाटियाचे प्रसिद्ध आयटम साँग 'आज की रात' वर परफॉर्म केलं. सोशल मीडियावर सध्या या डान्स रील्स ट्रेंडिंगमध्ये आहे. त्यामुळे हेच हेरून कदाचित तिने या गाण्यावर डान्स केला. पण इंटरनेट यूर्जसने मुलांच्या पालकांवर प्रश्चचिन्ह उपस्थितीत केलं. 

fallbacks

आपण मुलांना नेमकं काय संस्कार करतोय, असा प्रश्न नेटकऱ्यांनी विचारला आहे.  हा व्हिडीओ X वर @wokeflix_ या हँडलसह शेअर करण्यात आलाय. ज्याच्या कॅप्शनमध्ये 'आम्ही पालकत्वातही अपयशी आहोत' असं लिहिलंय.

 
 
 
 
 
 
 
 
 
 
 
 
 
 
 

A post shared by @backu_p9675

व्हिडीओ पाहणाऱ्या एका वापरकर्त्याने लिहिलंय की, 'सुधारणा: इथे अपयश दोन्ही बाजूंनी आहोत, शालेय शिक्षण आणि पालकत्व.' दुसऱ्या यूजरने लिहिलंय की, 'म्हणूनच आम्हाला परदेशासारख्या शाळांची परंपरा असलेल्या अशा शैक्षणिक संस्थांची गरज नाही तर गुरुकुलची गरज आहे.' तिसऱ्या वापरकर्त्याने लिहिलंय की, 'हे पालकांकडून शाळेपर्यंतचं संपूर्ण अपयश आहे.' चौथ्या यूजरने लिहिलंय की, 'आम्ही मुलांचं काय करत आहोत?'

या पोस्टला आतापर्यंत साडेआठ हजारांहून अधिक लाईक्स मिळाले आहेत. तर या व्हिडिओवर हजारो कमेंट्स आल्या आहेत.

 

Read More