Marathi News> भारत
Advertisement

Video : नववधूच्या डान्सने स्टेजला लावली आग; पाहून व्हाल थक्क

डोक्यावर पदर घेत नववधूने केलेल्या या डान्सने सर्वांच्यांच हृदयाचे ठोके वाढवले 

Video : नववधूच्या डान्सने स्टेजला लावली आग; पाहून व्हाल थक्क

भारतातील विवाहसोहळ्यांमध्ये (Indian Wedding) नृत्याला खूप महत्त्व असते. आजकाल तर लग्नाला येणारे नातेवाईकही नृत्यदिग्दर्शकाकडून खास नृत्य (Dance) शिकून ते सादर करत असतात. त्यामुळे तुम्हीही सोशल मीडियावर डान्सचे अनेक व्हिडिओ पाहिले असतील. यामध्ये काही वरातीमध्ये विचित्र पद्धतीने नाचणाऱ्यांचा तर काही वधू-वरांचे  (Groom-Bride) व्हिडीओ असतात. पण या नववधूने तर आपल्या नृत्याने स्टेजलाच आग लावली आहे.

या व्हिडीओमध्ये एक वधू डोक्यावर पदर घेतलेली दिसत आहे जी डान्स करण्यासाठी खूप उत्सुक दिसत आहे. तिच्या डान्समुळे अनेकांच्या हृदयाचे ठोके वाढू शकतात, याची कुणालाही कल्पना नव्हती. 

या व्हिडीओमध्ये सपना चौधरीच्या (Sapna Choudhary) 'गजबन' गाण्यावर वधू अतिशय सुंदरपणे नाचत आहे. वधूचा आत्मविश्वास देखील खरोखर आश्चर्यकारक आहे.  या व्हिडिओतील वधूचा डान्स पाहून अनेकांना प्रतिक्रिया देण्यापासून रोखता येत नाही. लग्नाला आलेल्या सर्व पाहुण्यांनाही आश्चर्य व्यक्त केले.

हा व्हिडिओ यूट्यूब या सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर शेअर करण्यात आला आहे. लाखो लोकांनी हा व्हिडिओ पाहिला आहे. इतकेच नाही तर अनेकांनी या व्हिडिओला लाइकही केले आहे. कमेंट सेक्शनमध्ये लोक वेगवेगळ्या प्रतिक्रिया देताना दिसले. काहींनी वधूच्या नृत्याचे कौतुक केले तर काहींनी फायर इमोजी पाठवले आहेत.

Read More