Marathi News> भारत
Advertisement

वाघाने भर रस्त्यातून तरुणीला फरफटत नेलं..व्हिडीओ पाहून येईल अंगावर काटा

महिला गाडीजवळ येते गाडीत बसणार कारचा दरवाजा उघडते आणि आत जाते. तसा तिच्यामागून धावत एक वाघ येतो. जो तिच्यावर हल्ला करतो.

वाघाने भर रस्त्यातून तरुणीला फरफटत नेलं..व्हिडीओ पाहून येईल अंगावर काटा
Updated: Nov 01, 2022, 08:09 PM IST

Viral trending video on social media : सोशल मीडियावर (social media) नेहमीच काहींना काही व्हायरल होत असतं. व्हायरल (viral video) होणारे काही व्हिडीओ फारच मजेशीर असतात.

काही व्हिडीओ घाबरवणारे  (scarry viral video) असतात तर काही प्राण्यांचे,सापांचे व्हिडीओ असतात.सोशल मीडियावर व्हायरल होणारे हे व्हिडीओ खूप पहिले जातात.

आणि शेअरसुद्धा केले जातात. लोकांना खूप आवडणारे व्हिडीओ वाऱ्यासारखे पसरतात. असाच एक व्हिडीओ सध्या सोशल मीडियावर धुमाकूळ घालत आहे, हा व्हिडीओ आतापर्यंत बऱ्याच लोकांनी पाहिलंय आणि शेअरसुद्धा केला आहे.

व्हायरल होत असणारा व्हिडीओ पाहून तुमच्याही अंगावर काटा आल्याशिवाय राहणार नाही हे नक्की..आतापर्यंत लाखो लोकांनी हा व्हिडीओ पहिला आहे. व्हिडीओ जर नीट पहिला तर तुम्हाला कळेल कि रस्त्यावर काही गाड्या उभ्या आहेत.

एक महिला या गाडीत बसण्यासाठी गाडीजवळ येऊन उभी राहते मात्र त्यांनतर जे घडत ते पाहून तुमच्याही अंगावर काटे आल्याशिवाय राहणार नाहीत. 

महिला गाडीजवळ येते गाडीत बसणार कारचा दरवाजा उघडते आणि आत जाते. तसा तिच्यामागून धावत एक वाघ येतो. जो तिच्यावर हल्ला करतो.

तिला जबड्यात धरतो आणि फरफटत घेऊन जातो. त्यानंतर कारमधील लोक बाहेर येतात आणि वाघ ज्या दिशेने तरुणीला घेऊन गेला, त्या दिशेने ते लोक धावत जातात. पुढे ही तरुणी वाचते कि वाघ तिचा फडशा पडतो हे अद्याप कळू शकाल नाहीये मात्र व्हिडीओ पाहून अनेक लोक त्या तरुणीच्या सुटकेसाठी प्रार्थना करत आहेत.  

त्यामुळे जंगल भागात थांबणार असाल तर काळजी घ्या नाहीतर कधी कुठला प्राणी मागून तुमच्यावर हल्ला करेल सांगता येत नाही. 

 
 
 
 
 
 
 
 
 
 
 
 
 
 
 

A post shared by Animal Power (@animals_powers)