Marathi News> भारत
Advertisement

महिला पोलीस अधिकाऱ्याने ''लिहिली आणि गायली मास्क न लावणाऱ्यांसाठी खास आरती'...ऐका

तुम्ही तसे कोरोना काळात अशा अनेक लोकांचे व्हायरल व्हीडिओ पाहिले असणार ज्यामुळे तुम्हाला तुमचे हसू अवरले नसेल. 

महिला पोलीस अधिकाऱ्याने ''लिहिली आणि गायली मास्क न लावणाऱ्यांसाठी खास आरती'...ऐका

कांकेर : संपूर्ण देशात कोरोनाने हाहाकार माजवला आहे. त्यात कोरोनाची दुसरी लाट आल्याने आधीक लोकं कोरोनाने संक्रमीत होत आहेत. तर काही लोकांचे कोरोनाने प्राण गेले आहेत. पंरतु असे बरेच लोकं जे अजूनही कोरोनाला गांभिर्याने घेत नाहीत. खरेतर या काळात सगळ्यांनी सामाजीक अंतर आणि मास्क लावणे यावर भर दिले आहे. कारण लसीकरण मोहिम जरी भारतात सुरु झाली असली तरी, संपूर्ण देशाचे लसीकरण होईपर्यंत मास्क आणि सामाजिक अंतर ठेवण्याची गरज आहे.

तुम्ही तसे कोरोना काळात अशा अनेक लोकांचे व्हायरल व्हीडिओ पाहिले असणार ज्यामुळे तुम्हाला तुमचे हसू अवरले नसेल. या काळात काही असे अती उत्साही लोकं आहेत ज्यांनी मोठ मोठे कारनामे केले आहेत. असाच एक छत्तीसगढमधील कांकेर भागातील एक व्हीडिओ सोशल मीडियावर व्हायरल होत आहे. ज्यामध्ये या धाडसी लोकांच्या कारनाम्यांना पाहून एका महिला पोलिसांने त्यांची आरती केली आहे.

खरेतर देशात मास्क लावणे बंधनकारक असताना, या दोन धाडसी लोकं कोरोनाला न घाबरता बाहेर फिरत आहेत. यांचे हे प्रताप पाहून पोलिस ही स्वत:ला त्यांची आरती करण्यापासून थांबवू शकले नाहीत. या व्हीडिओमध्ये तुम्ही पाहू शकता की, ही महिला पोलिस दोन धाडसी लोकांची स्वत:च्या तोंडाने गाणं बोलून त्यांची आरती करत आहे.

हा व्हीडिओ सोशल मीडियावर सध्या भलताच व्हायरल झाला आहे. ज्याला लोकं या व्हीडिओवर शेअर आणि कमेंट्स चा पाऊस पाडत आहे.

Read More