Marathi News> भारत
Advertisement

Viral | शेकडो खतरनाक सापांना गळ्यात घेऊन फिरणारे लोक; अशा यात्रेचा कधीही न पाहिलेला व्हिडिओ

 सोशल मीडियावर अनेकदा युनिक व्हिडिओ वायरल होतात. सध्या एक खतरनाक व्हिडिओ सोशलमीडियावर वायरल होत आहे. 

Viral | शेकडो खतरनाक सापांना गळ्यात घेऊन फिरणारे लोक; अशा यात्रेचा कधीही न पाहिलेला व्हिडिओ

नवी दिल्ली : सोशल मीडियावर अनेकदा युनिक व्हिडिओ वायरल होतात. सध्या एक खतरनाक व्हिडिओ सोशलमीडियावर वायरल होत आहे. आपल्या देशातील वेगवेगळ्या भागात विशेष अशा रुढी, चालीरिती पाळल्या जातात. सोशलमीडियावर अशाच एका यात्रेचा व्हिडिओ वायरल होतोय. ज्यामध्ये असंख्य लोक साप गळ्यात आणि हातात घालून चालत आहेत. 

सापांसह रस्त्यावर उतरले लोक
आयपीएस अधिकारी रुपिन शर्मा यांनी आपल्या ट्विटर हॅडलवर एक व्हिडिओ शेअर केला आहे. या विचित्र व्हिडिओमध्ये असंख्य लोकं साप गळ्यात किंवा हातात घेऊन चालत आहेत. हा व्हिडिओ बघायला खूपच भितीदायक वाटत असला तरी, हजारो लोकांनी सोशलमीडियावर शेअर केला आहे. 

सापाला पाहिल्याबरोबर आपला थरकाप उडतो. परंतु या यात्रेतील लोकांना सापांचे अजिबात भय नाही. ते साप मित्र असल्यासारखे त्याला घेऊन निघाले आहेत. 

हा व्हिडिओ नक्की कोणत्या ठिकाणचा आहे याबाबत माहिती मिळू शकलेली नाही. अनेकजण हा व्हिडिओ उत्तरप्रदेश किंवा बिहारचा असल्याचे कमेंट करीत आहेत

Read More