Marathi News> भारत
Advertisement

पुन्हा जिवंत होईल म्हणून गावकऱ्यांनी तरुणाला शेणात गुडाळले, पण एक तासाने खरे सत्य समोर आले...

 रविवारी एक तरुण आपल्या वडिसांसोबत गहू कापणीला गेला होता, त्यादरम्यान वातावरण बदल झाला. ज्यानंतर जोरात वीज कडाडली.

पुन्हा जिवंत होईल म्हणून गावकऱ्यांनी तरुणाला शेणात गुडाळले, पण एक तासाने खरे सत्य समोर आले...

मुंबई : सुरगुजा जिल्ह्यातील एक धक्कादायक बातमी समोर आली आहे. येथे रविवारी एक तरुण आपल्या वडिसांसोबत गहू कापणीला गेला होता, त्यादरम्यान वातावरण बदल झाला. ज्यानंतर जोरात वीज कडाडली, ज्यानंतर या तरुणावर वीज पडली. यामुलाचे वडिल त्याला नंतर गावात घरी घेऊन गेले. ज्यानंतर गावकऱ्यांनी या तरुणाच्या अंगाला शेण लवून त्याला ठेवले. ज्यानंतर रुग्णवाहिका बोलवण्यात आली. या मुलाला जेव्हा रुग्णालयात नेण्यात आले, तेव्हा डॉक्टरांनी त्याला मृत घोषीत केले. 

खरंतर सुरगुजा जिल्ह्यातील दरिमा पोलीस स्टेशन हद्दीतील कोरवापारा गाव महेशपूर येथे राहणारा 18 वर्षांचा अमित टोप्पो रविवारी दुपारी वडील ज्योतिष प्रकाश टोप्पो यांच्यासोबत गव्हाच्या शेतात गेला होता. इथे गव्हाची कापणी करण्याबरोबरच दोघेही पहारा देत होते. दरम्यान, हवामान बिघडले आणि जोरदार वारे वाहू लागले.

हलक्या रिमझिम पावसासह ढगांचा गडगडाटही सुरू झाला. तेव्हा इतक्यात मोठा आवाज झाला आणि वीज पडली, ज्याच्या धक्का लागून अमित कोसळला. हे पाहून जवळच असलेले त्याचे वडील त्याला आपल्या हातांनी उचलून घरी घेऊन आले.

fallbacks

त्यानंतर गावातील ज्येष्ठांच्या सांगण्यावरून तरुणाच्या अंगावर शेणखत टाकण्यात आले. वीज पडलेल्या व्यक्तीवर शेणाचा लेप लावल्याने तो जिवंत होतो, अशी गावागावांत समजूत आहे. ज्यामुळे त्यांनी हे केलं. संपूर्ण घटना घडल्यानंतर रुग्णवाहिका गावात आली आणि तरुणाला आपल्यासोबत घेऊन गेली, हे सगळं प्रकरण होईपर्यंत जवळजवळ एक तास उलटला होता.

रुग्णालयात नेल्यानंतर डॉक्टरांनी तरुणाचा मृत्यू झाला असल्याचे सांगितले, खरंतर विज पडल्यानंतर लगेचच तरुणाचा मृत्यू झाला होता. परंतु गावकऱ्यांचा असा विश्वास होता की, शेण लावल्याने तो जिवंत होईल, परंतु असे काहीही झाले नाही. तरुणाचा आधीच मृत्यू झाला होता.

Read More