Marathi News> भारत
Advertisement

बुड्ढा होगा तेरा बाप! वयाच्या 102व्या वर्षी आजोबांची निघाली वरात, पाहा VIDEO

आजोबांच्या वरातीचा VIDEO सोशल मीडियावर व्हायरल

बुड्ढा होगा तेरा बाप! वयाच्या 102व्या वर्षी आजोबांची निघाली वरात, पाहा VIDEO

रोहतक : सोशल मीडियावर अनेक व्हिडिओ व्हायरल (video viral) होत असतात. या मधील अनेक व्हिडिओ नेटकऱ्यांना आवडत असतात. तर काही व्हिडिओ असे असतात, जे नेटकऱ्यांना पुन्हा पुन्हा पाहावेसे वाटतात. असाच एक व्हिडिओ समोर आला आहे. या व्हिडिओत एका आजोबाची (102 Year Old Man Baraat) वरात काढण्यात आल्याचे दिसत आहे. मात्र ही वरात नसुन भलतंच काही तरी असल्याचं समोर आलं आहे.  त्यामुळे हे नेमकं काय आहे ते जाणून घेऊयात. 

व्हिडिओत काय?
व्हिडिओत तुम्ही पाहू शकता की, रस्त्यावर मस्तपैकी लग्नासाऱखी वरात काढण्यात आल्याचे दिसत आहे. मस्त बॅ्ंड बाजा बारात आहे, रथही सजल आहे. या रथात एक 102 वर्षीय आजोबा बसल्याचे दिसत आहे. असं वाटतंय की त्यांची ही लग्नाची वरात आहे. आणि 102 वर्षीय आजोबा (102 Year Old Man Baraat)  लग्नाच्या बेडीत अडकणार असल्याचे दिसत आहे. मात्र प्रत्यक्षात जसं व्हिडिओत दिसतंय तसं नाहीए. 

वरात नाही तर...
व्हिडिओ पाहिल्यावर असं वाटतंय की, ही लग्नाची वरात आहे. मात्र प्रत्यक्षात तसं नाही आहे. प्रशासनाचा निषेध करण्यासाठी आजोबांनी केलेले हे आंदोलन आहे. मात्र अशाप्रकारे आंदोलन करण्याची गरज काय असा प्रश्न तुम्हाला पडला असेल? तर आम्ही तुम्हाला सांगतो की, प्रशासनाचा भोंगळ कारभार चव्हाट्यावर आणण्यासाठी त्यांनी हे आंदोलन केले होते.  

प्रकरण काय? 
हरियाणा सरकारने (Hariyana Government)  102 वर्षीय आजोबा (102 Year Old Man Baraat)  दुलिचंद यांना  मृत घोषित करून वृद्धापकाळ पेन्शन बंद केली होती. गेल्या अनेक महिन्यांपासून ते सरकारी कार्यालयाच्या फेऱ्या मारून आपण जिवंत असल्याचे सिद्ध करण्याचा प्रयत्न करत होते. मात्र प्रशासन त्यांचे काही एक ऐकत नव्हते. त्यामुळे आजोबाने स्वत:ला जिवंत असल्याचे सिद्ध करण्यासाठी मिरवणूक काढली होती. या मिरवणूकीत ढोल ताशा वाजवण्यात आले होते. तर आंदोलक 'थारा फूफा अभी जिंदा है' अशा हातात पाट्या घेऊन प्रशासनाचा निषेध करताना दिसत होते. 

दरम्यान हरियाणातील (Hariyana Government) रोहतकमधून ही घटना समोर आली आहे. या घटनेचा व्हिडिओ सोशल मीडियावर व्हायरल होत आहे. 

Read More