Marathi News> भारत
Advertisement

15 वर्षीय विद्यार्थिनीचा पाठलाग करत मानेवर झाडली गोळी; धक्कादायक VIDEO समोर

भाजी विक्रेत्याच्या मुलीवर तरुणाने मागून गोळी झाडल्याची घटना सीसीटीव्हीमध्ये कैद झाली आहे

15 वर्षीय विद्यार्थिनीचा पाठलाग करत मानेवर झाडली गोळी; धक्कादायक VIDEO समोर

दिल्ली : सत्ता पालटानंतर पुन्हा एकदा बिहार (Bihar)चर्चेत आलं आहे. मंगळवारी एका डॉक्टरची हत्या करण्यात आल्यानंतर आणखीन एक धक्कादायक घटना समोर आली आहे. बिहारची राजधानी पाटना (Patna) येथील बेऊर पोलीस स्टेशन हद्दीत असलेल्या इंद्रपुरी परिसरातील 15 वर्षीय एका मुलीवर बुधवारी रोजी गोळ्या झाडण्यात आल्या आहेत. 

पाटणामधील बेऊर पीएसच्या सिपारा भागातील इंद्रापुरी परिसरात एका भाजी विक्रेत्याच्या मुलीवर गोळी झाडली (vegetable vendor daughter shot in Patna). मानेवर गोळी लागल्याने जखमी झालेल्या तरुणीवर खासगी रुग्णालयात उपचार सुरू आहेत. हे प्रेमप्रकरण असल्याचे बोलले जात आहे, असे पाटणा पोलिसांनी सांगितले.

विद्यार्थिनी आपल्या कोचिंग क्लासवरून घरी परतत असताना दुचाकीवरून आलेल्या दोन तरुणांनी तिचा पाठलाग केला. त्यानंतर त्यातील एकाने तिच्यावर मागून गोळी झाडली. गोळी मुलीच्या मानेवर लागली आणि त्यानंतर ती जमिनीवर पडली. तिच्या डोक्यावरही जखमेच्या खुणा आहेत. या घटनेचे सीसीटीव्ही फुटेजही समोर आले असून, त्यात गुन्हेगार मागून तरुणीवर गोळीबार करताना दिसत आहे.

विद्यार्थिनीच्या कुटुंबीयांना घटनेची माहिती मिळताच तिला बेऊर पोलीस ठाण्याच्या हद्दीतील हिमालय नर्सिंग होममध्ये दाखल करण्यात आले. या विद्यार्थिनिवर सध्या रुग्णालयात उपचार सुरु आहेत.

 

या घटनेची माहिती मिळताच पोलिसांनी घटनास्थळी दाखल होत तपास सुरु केला आहे. गोळी मारणाऱ्या तरुणाची पोलिसांनी ओळख पटवली असून लवकरच त्याला अटक करण्यात येईल असे पोलिसांनी सांगितले. मात्र यामागील नेमकं कारण अद्याप समोर आलेलं नाही. पोलीस लवकरच जखमी मुलीचा जबाब नोंदवणार आहे.

Read More