Marathi News> भारत
Advertisement

Viral video : स्टाईल मारणं तरुणाला पडलं महागात...

काही लोकांमध्ये इतका संयम नसतो. ते उठतात आणि लागतात आपल्या कामाला.

Viral video : स्टाईल मारणं तरुणाला पडलं महागात...

मुंबई : सोशल मीडियावर लोकं दररोज काही ना काही पोस्ट करत असतात. त्यात लोकं आपल्याला येणाऱ्या कला सादर करत असतात. काहींच्या कला किंवा त्यांच्या अंगातील गुण हे खरोखरच कौतुकास्पद असतात. परंतु काही लोकं अशी असतात जे इतरांना पाहून आपण ही तसं करु शकतो हे दाखवण्याचा प्रयत्न करतात. लोकांनी आशा बाळगाव्यात किंवा लोकांची नकल करावी. परंतु यासाठी त्यांच्याप्रमाणे मेहनत आणि कठोर परिश्रम करण्याची तयारी देखील असावी.

परंतु काही लोकांमध्ये इतका संयम नसतो. ते उठतात आणि लागतात आपल्या कामाला. कॉन्फिडन्स असावा, परंतु ओव्हर कॉन्फिडन्स असू नये, याचे हे जिवंत उदाहरण सोशल मीडियावर सध्या व्हायरल होत आहे.

सोशल मीडियावर व्हायरल होत असलेल्या एका व्हिडीओमध्ये एक मुलगा स्टंट करायला जातो परंतु तो स्टंट असा फसतो की, ज्यामुळे एका गटारात हा तरुण जाऊन पडतो आणि त्याचे तोंड काळे होते.

सोशल मीडियावर व्हायरल झालेल्या व्हिडीओमध्ये असे दिसत आहे की, एका तरुणाला आपला स्टंट सगळ्यांना दाखवायचा होता. परंतु हे स्टंट करताना तो तरुण त्याचा तोल सांभाळू शकला नाही. ज्यामुळे तो बाजूच्या नाल्यात पडला. या तरुणाचं नशीब इतकं वाईट की, त्याचं तोंड गटाराच गेलं आणि काळं झालं.

 
 
 
 
 
 
 
 
 
 
 
 
 
 
 

 

या मुलाच्या हावभावावरून किंवा त्याच्या वागण्यावरुन असा अंदाजा लावला जात आहे की, त्याने नशा केला असावा. ज्यामुळे तो त्याचा तोल सांभाळू शकला नाही आणि गटारात पडला.

tarunsa-official07 या नावाच्या एका अकाउंटवरुन हा व्हिडीओ इन्स्टाग्रामवर शेअर केला आहे. हा व्हिडीओ पाहिल्यानंतर लोकांना त्यांचे हसू आवर नाही आहे. या व्हिडीओला आतापर्यंत हे 13 हजाराहून अधिक लाईक्स मिळाले आहेत. तसेच यावर लोकं भरभरुन कमेंट्स करत आहेत.

Read More