Marathi News> भारत
Advertisement

तुम्ही चप्पल घालून बाईक चालवता तर ही बातमी वाचाच; नाही तर होऊ शकतो दंड

बाईक चालकांसाठी महत्त्वाची बातमी...

तुम्ही चप्पल घालून बाईक चालवता तर ही बातमी वाचाच; नाही तर होऊ शकतो दंड

देशभरात गेल्या काही दिवसांपासून रस्ते अपघातासंदर्भात (road accident) सरकारने (central government) कठोर पावलं उचलली आहेत. त्यामुळेच सरकारने मोटार वाहन चालकांसंदर्भातील (vehicle rules) नियमांवर आणखी भर देत कारवाई करण्यास सुरुवात केली आहे. तसेच मोटार वाहन चालकांनी वाहतुकीशी (traffic rules) संबंधित सर्व आवश्यक नियमांचे पालन करण्यासाठी वारंवार यासंदर्भात जाहिरातीही करण्यात येत आहेत. (vehicle traffic rules police get Challan for Riding Bike In Slippers)

याचा उद्देश म्हणजे सुरक्षित रहदारीचे वातावरण निर्माण करणं आणि चालकाची सुरक्षा. जर वाहतुकीशी संबंधित (Driver safety) नियमांचे (traffic rules) तु्म्ही उल्लंघन केलं तर, पोलिसांकडून (traffic police) तुम्हाला दंड आकारला जाऊ शकतो. या दंडाची रक्कम खूप जास्त देखील असू शकते.

याशिवाय काही प्रकरणांमध्ये तुरुंगात (Jail) जावं लागू शकतं. त्यामुळे तुम्हाला दंड (E-Challan) आकारला जाऊ नये असं वाटत असेल तर वाहतूक नियमांचे पालन करा. मात्र काही वाहतूक नियम आहेत ज्याबद्दल बहुतेक लोकांना माहिती नाही. 

काही लोकांना वाटतं की ते सर्व नियमांचे पालन करून प्रवास करत आहेत. आपण वाहतूक नियमांचे उल्लंघन करत आहोत हेही त्यांच्या लक्षातही येत नाही. मग जेव्हा वाहतूक पोलीस त्यांना पकडतात तेव्हा त्यांच्या लक्षात येते की त्यांनी वाहतूक नियमांचे उल्लंघन केले आहे.

चप्पल घालून दुचाकी चालविण्यास मनाई

असाच एक आहे ज्यानुसार  स्लीपर किंवा 'चप्पल' घालून दुचाकी चालवता येत नाही (Challan For Riding Bike In Slippers). अनेकांना या नियमाबद्दल कदाचित माहितीही नसते. सध्याच्या वाहतुकीच्या नियमांनुसार दुचाकीस्वारांना स्लीपर (Slipper) किंवा 'चप्पल' (sandals) घालून चालवण्याची परवानगी नाही. दुचाकी चालवताना पूर्णपणे बंद शूज घालणे आवश्यक आहे. तसे न केल्यास 1000 रुपये दंड होऊ शकतो.

यासोबतच दुचाकी किंवा स्कूटर चालवताना पॅन्ट (Pant) आणि शर्ट (shirts) किंवा टी-शर्ट घालणे आवश्यक आहे. या नियमाचे उल्लंघन केल्यास दंड देखील होऊ शकतो.

याशिवाय जर दुचाकीवर हेल्मेट न घातल्यास 1000 रुपये दंड आकारला जातो. त्याचबरोबर दुचाकीशी संबंधित कागदपत्रे नसली तरी हजारो रुपयांचा दंड होऊ शकतो.

Read More