Marathi News> भारत
Advertisement

पाच महिन्यांनंतर वैष्णोदेवी यात्रा सुरु; दररोज इतके भाविक घेऊ शकतात दर्शन

दर्शनासाठी येणाऱ्या भक्तांना ऑनलाईन रजिस्ट्रेशन करणं गरजेचं असणार आहे. 

पाच महिन्यांनंतर वैष्णोदेवी यात्रा सुरु; दररोज इतके भाविक घेऊ शकतात दर्शन

नवी दिल्ली : पाच महिन्यांनंतर जम्मूतील वैष्णोदेवी मंदिर Vaishno Devi आज रविवारपासून भक्तांसाठी खुलं करण्यात आलं आहे. वैष्णोदेवी मंदिरासह जम्मू-काश्मीरमधील सर्व धार्मिक स्थळं आजपासून खुली करण्यात आली आहेत. 

कोरोना व्हायरसमुळे गेल्या पाच महिन्यांपासून वैष्णोदेवी मंदिर सर्वसामान्य लोकांसाठी बंद होतं. परंतु जम्मू-काश्मीर प्रशासनाने आज 16 ऑगस्टपासून मंदिर सर्वच भक्तांना दर्शनासाठी खुलं केलं आहे. आता वैष्णोदेवी यात्रा दिवस-रात्र आठवड्यातील सातही दिवस सुरु राहणार आहे.

श्री माता वैष्णोदेवी श्राईन बोर्डचे Mata Vaishno Devi Shrine Board मुख्य कार्यकारी अधिकारी रमेश कुमार यांनी दिलेल्या माहितीनुसार, तीर्थ यात्रा पुन्हा सुरु झाल्याच्या पहिल्या आठवड्यात दररोज 2000 भाविकांना यात्रेसाठी परवानगी देण्यात आली आहे. यात जम्मू-काश्मीरचे 1900 भाविक आणि बाहेरील 100 भाविकांचा समावेश असणार आहे. 

दर्शनासाठी येणाऱ्या भक्तांना ऑनलाईन रजिस्ट्रेशन करणं गरजेचं असणार आहे. सध्या काऊंटर रजिस्ट्रेशन बंद आहे. रजिस्ट्रेशन असणाऱ्या भक्तांनाच यात्रेसाठी परवानगी असणार आहे. 

 

Read More