Marathi News> भारत
Advertisement

26/11: अमेरिकेने दहशतवाद्यांना मारण्यासाठी केला होता खास प्लान, अधिकाऱ्याचा खुलासा

व्हाईट हाऊसने तयार केलेला खास प्लान

26/11: अमेरिकेने दहशतवाद्यांना मारण्यासाठी केला होता खास प्लान, अधिकाऱ्याचा खुलासा

मुंबई : 26 नोव्हेंबर 2008 ला मुंबईमध्ये झालेल्या दहशतवादी हल्ल्याला आज 10 वर्ष पू्र्ण झाली आहेत. या दिवशी 10 दहशतवाद्यांनी मुंबईच्या अतिमहत्त्वाच्या ठिकाणांवर हल्ला करत संपूर्ण जगाला धक्का दिला होता. देशाच्या इतिहासातील हा सर्वात मोठा हल्ला होता. आजही प्रत्यक्षदर्शींसाठी त्या आठवणी अंगावर काटा उभा करतात. 10 दहशतवाद्यांपैकी अजमल कसाबला जिवंत पकडण्यात आलं होतं. ज्याला 21 नोव्हेंबर 2011 मध्ये पुण्याच्या येरवडा कारागृहात फाशी देण्यात आली होती.

26/11 दहशतवादी हल्ला झाला तेव्हा अमेरिकेने देखील पाकिस्तानातील दहशतवादी संघटना लष्कर ए तैयबाच्या दहशतवाद्यांना मारण्यासाठी प्लान तयार केला होता. अमेरिकेच्या तत्कालीन बुश सरकारने आपल्या विशेष जवानांना मुंबईतील दहशतवाद्यांना संपवण्यासाठी तयार केलं होतं. याचा खुलासा व्हाईट हाऊसच्या एका माजी अधिकाऱ्याने केला आहे.

26/11 दहशतवादी हल्ल्यादरम्यान व्हाइट हाऊच्या संकट व्यवस्थापन समितीचे सदस्य असलेले अनीश गोयल यांनी खुलासा केला आहे की, भारतीय अधिकाऱ्यांकडून मंजुरी मिळण्याआधी आणि अमेरिकेचे कमांडो रवाना होण्याआधीच भारतीय जवानांनी या दहशतवाद्यांचा खात्मा केला.

भारताची आर्थिक राजधानी मुंबईवर झालेल्या या दहशतवादी हल्ल्यात 166 लोकांचा मृत्यू झाला होता. या हल्ल्यात अनेक परदेशी नागरिक देखील मारले गेले होते. 2008 मध्ये झालेल्या या हल्ल्य़ादरम्यान व्हाईट हाउसमध्ये या घटनेवर चर्चा झाली. गोयल यांनी म्हटलं की, अमेरिकेकडे त्यांची एक विशेष टीम होती. ज्यांना अशा हल्ल्यावेळी खास प्रशिक्षण देऊन तयार करण्यात आलं होतं.  दहशतवाद्यांना मारण्यासाठी आम्ही तात्काळ योजना बनवणं सुरु केलं होतं.'
 
अमेरिकेने या हल्ल्य़ामागे कोण जबाबदार आहे याचा शोध घेण्यासाठी फॉरेंसिक मदत देखील देऊ केली होती. त्यावेळी व्हाईट हाउस या दहशवतादी हल्ल्याशी संबंधित भारताकडून मागण्यात येणाऱ्या कोणत्याही मदतीसाठी तयार होता.

Read More