Marathi News> भारत
Advertisement

IAS अधिकाऱ्याला पोस्टींगनंतर 'ही' कामे करावी लागतात, जाणून घ्या

राष्ट्रपतींच्याच हातातच असते IAS अधिकाऱ्याला निलंबित करण्याची पॉवर, इतक्या मोठ्या पदाबाबत 'या' गोष्टी तुम्हाला माहितीयतं का? 

 IAS अधिकाऱ्याला पोस्टींगनंतर 'ही' कामे करावी लागतात, जाणून घ्या
Updated: Jul 25, 2022, 03:10 PM IST

मुंबई : दरवर्षी यूपीएससीचा निकाल प्रसिद्ध होतो. यामध्ये टॉपवर असणाऱ्यांना आयएएस आणि आयपीएस बनवण्याची संधी मिळते. एका वर्षाच्या प्रशिक्षणानंतर हे यशस्वी उमेदवार देखील क्षेत्रात काम करण्यास सुरुवात करतात. परंतु तुम्हाला माहितीय का आयएएस अधिकाऱ्यांना पोस्टींगनंतर कोणती कामे करावी लागतात. त्यांच्याकडे कोणकोणत्या पॉवर्स असतात.     

प्रथम पोस्टिंग

आयएएस हे नागरी सेवेतील सर्वोच्च पद आहे. प्रशिक्षणानंतर, आयएएसना त्यांच्या कॅडरमध्ये पाठवले जाते आणि तेथे त्यांना विशिष्ट क्षेत्र किंवा विभागाचा कार्यभार सोपविला जातो. आयएएस अधिकाऱ्याची पहिली पोस्टिंग ही उपविभागीय दंडाधिकारी म्हणून असते. यानंतर त्यांची डीएम आणि उपायुक्त पदांवर नियुक्ती केली जाते.

 केंद्र आणि राज्य सचिवालयातील पदांवर फक्त आयएएस अधिकाऱ्यांची नियुक्ती केली जाते. तेथे हे अधिकारी पीएसयू प्रमुख म्हणून काम करतात. जिल्हा स्तरावर काम करण्याव्यतिरिक्त, आयएएस अधिकारी कॅबिनेट सचिव तसेच सहसचिव, उपसचिव आणि अप्पर सचिव म्हणून काम करतात.

कामे आणि पॉवर्स
आयएएस अधिकाऱ्यांना महसुलाशी संबंधित कामे करावी लागतात. जसे की महसूल गोळा करणे इ. जिल्ह्यातील कायदा व सुव्यवस्था राखण्यासाठी, कार्यकारी दंडाधिकारी म्हणून काम करणे, मुख्य विकास अधिकारी (CDO) किंवा जिल्हा विकास आयुक्त म्हणून काम करणे. राज्य सरकार आणि केंद्र सरकारच्या धोरणांची जिल्ह्यात प्रभावीपणे अंमलबजावणी करणे यासाठी ते/ती जबाबदार आहेत. योजनांवर देखरेख ठेवणे त्यांची तपासणी करणे. तसेच सरकारी धोरण बनवताना सहसचिव, उपसचिव म्हणून सल्ला देणे आणि धोरणांना अंतिम स्वरूप देण्याचे कामही ते करतात. 

आयएएस डीएमच्या भूमिकेत असतो तेव्हा त्याच्याकडे जिल्ह्यातील सर्व विभागांची जबाबदारी असते. डीएम म्हणून ते पोलिस विभाग तसेच इतर विभागांचे प्रमुख आहेत. जिल्ह्यातील प्रतिबंधात्मक आदेश, कलम 144 आणि कायदा व सुव्यवस्थेशी संबंधित सर्व निर्णय ते घेतात. जमावावर कारवाई करणे किंवा गोळीबार करणे असे आदेशही डीएम देऊ शकतात.

राष्ट्रपतीचं निलंबित करू शकतात
जिल्ह्यातील कोणत्याही कामात डीएमला निष्काळजीपणा आढळून आल्यास ते कर्मचाऱ्यांना निलंबित करू शकतात आणि त्यांच्याविरुद्ध एफआयआर नोंदवू शकतात. दुसरीकडे, आयएएसला निलंबित करण्याचा अधिकार केवळ राष्ट्रपतींना आहे. इतर कोणीही ही कारवाई करू शकत नाही.

आयएएस अधिकाऱ्यांना मिळणारी पदे 

आयएएस अधिकाऱ्याला एसडीओ, एसडीएम, संयुक्त जिल्हाधिकारी, मुख्य विकास अधिकारी (सीडीओ), डीएम, डीसी, उपायुक्त, विभागीय आयुक्त, महसूल मंडळाचे सदस्य आणि महसूल मंडळाचे अध्यक्ष अशी पदे मिळू शकतात. अनुभवाच्या आधारे आयएएसची त्या त्या ठिकाणी नियुक्ती होत असते.