Marathi News> भारत
Advertisement

लॉकडाऊनमध्ये हेल्पलाईनवर फोन करून मागवले सामोसे, पोलिसांनी दिली अशी शिक्षा

लॉकडाऊनमध्ये केलेली मस्ती दोन तरुणांच्या अंगाशी 

लॉकडाऊनमध्ये हेल्पलाईनवर फोन करून मागवले सामोसे, पोलिसांनी दिली अशी शिक्षा

रामपूर : कोरोना व्हायरसचा प्रसार रोखण्यासाठी भारतात २१ दिवसांच्या लॉकडाऊनचा निर्णय घेण्यात आला. नागरिकांना अत्यावश्यक सेवांपासून वंचित राहायला लागू नये, म्हणून सरकारने हेल्पलाईन नंबर जाहीर केले. पण संकटाच्या या काळात हेल्पलाईन नंबरवर फोनकरुन नागरिकांकडून अत्यावश्यक सेवांऐवजी भलत्याच मागण्या केल्या जात आहेत.

उत्तर प्रदेशच्या रामपूर जिल्ह्यात हेल्पलाईन नंबरवर फोन करुन पान आणि सामोसे यांची ऑर्डर देण्यात आली. पान आणि सामोश्यांची मागणी करणाऱ्या दोघांना पोलिसांनी चांगलीच अद्दल घडवली. पोलिसांनी या दोघांना सफाई कर्मचाऱ्यांसोबत गटार साफ करायला लावलं.

fallbacks

'लॉकडाऊनदरम्यान गरजूंना मदत पोहोचवण्यासाठी हेल्पलाईन नंबर देण्यात आले आहेत. पण काही लोकं याचा गैरफायदा घेत आहेत. सुरुवातीला या लोकांना समजवण्यात आलं, पण आता ऐकत नसल्यामुळे अशा लोकांवर प्रशासनाने कडक कारवाई करायला सुरुवात केली आहे,' असं जिल्हाधिकारी आंजनेय कुमार सिंग यांनी सांगितलं.

कारण नसताना हेल्पलाईन नंबरवर फोन करणाऱ्यांना साफ-सफाई आणि समाज कार्य करायला सांगण्यात येत आहे. दोन मुलांनी फोनकरुन पान आमि सामोश्यांची ऑर्डर दिली. या दोघांची ओळख पटवून त्यांना गटार साफ करायला लावलं, असं जिल्हाधिकारी म्हणाले. राष्ट्रीय आपत्तीवेळी आमची डोकेदुखी वाढवण्यापेक्षा आम्हाला मदत करा, असं आवाहनही जिल्हाधिकाऱ्यांनी दिलं.

Read More