Marathi News> भारत
Advertisement

घर बांधण्यासाठी अॅडव्हान्स देणार सरकार, फक्त यांनाच मिळणार फायदा

जर तुमच्याकडे स्वत:ची जमीन आहे तर सरकारची नवीन योजना तुमच्यासाठी फायदेशीर ठरु शकते. सरकारच्या नव्या योजनेनुसार सरकार जमीनीची मालकी असणाऱ्यांना घर बांधण्यासाठी सरकार अॅडव्हान्स पैसे दोणार आहे. 

घर बांधण्यासाठी अॅडव्हान्स देणार सरकार, फक्त यांनाच मिळणार फायदा

लखनऊ : जर तुमच्याकडे स्वत:ची जमीन आहे तर सरकारची नवीन योजना तुमच्यासाठी फायदेशीर ठरु शकते. सरकारच्या नव्या योजनेनुसार सरकार जमीनीची मालकी असणाऱ्यांना घर बांधण्यासाठी सरकार अॅडव्हान्स पैसे दोणार आहे. 

२०२२पर्यंत प्रत्येकाचे स्वत:चे घर असावे असा केंद्र सरकारचा संकल्प आहे. यासाठी सुरु करण्यात आलेल्या प्रधानमंत्री आवास योजनेंतर्गत सरकार होम लोनवर सबसिडी देत आहे. आता सर्वांसाठी आवास शहरी मिशनमध्ये स्वत:ची जागा असणाऱ्या मात्र आर्थिकदृष्ट्या दुर्बल असणाऱ्यांना यूपी सरकार मदत करतेय.

५० हजार रुपये अॅडव्हान्स

पीएमएवाय योजनेंतर्गत चौथ्या श्रेणीतील लाभार्थींचा अर्ज स्वीकार होताच घर बांधण्यासाठी त्यांना ५० हजार रुपये त्यांच्या खात्यात ट्रान्सफर केले जातील. 

तीन हप्त्यात मिळणार पैसे

नव्या नियमांनुसार लाभार्थींना दुसऱा हप्ता १.५ लाख रुपये लेंटर अर्थात छत टाकण्याआधी दिले जातील. तर घराचे पूर्ण काम होण्याआधी अखेरचा ५० हजारांचा हप्ता दिला जाईल. याप्रमाणे लाभार्थींना संपूर्ण घर बांधण्यासाठी २.५० लाख रुपयांची मदत सरकारकडून केली जाणार आहे. 

आवास शहरी मिशनची चार श्रेणी

प्रधानमंत्री आवाज योजनेंतर्गत सर्व प्रकारच्या आवास शहरी मिशनला चार श्रेणींमध्ये विभागण्यात आलेय. या योजनेचा अनेकांना फायदा होतोय. २०२२पर्यंत देशातील प्रत्येकाचे स्वत:चे घर असावे असे केंद्र सरकारचे स्वप्न आहे. 

Read More