Marathi News> भारत
Advertisement

उन्नाव प्रकरणातील पीडितेची पाचव्या दिवशीही मृत्यूशी झुंज सुरूच

सरन्यायाधीशांनी पीडितेच्या प्रकृतीबद्दल विचारणा करत, पीडितेला एअरलिफ्ट करून एम्स रुग्णालयात हलवता येऊ शकतं का? याबद्दलही माहिती घेतली

उन्नाव प्रकरणातील पीडितेची पाचव्या दिवशीही मृत्यूशी झुंज सुरूच

लखनऊ : उन्नाव बलात्कार पीडित तरुणी अजूनही पाचव्या दिवशीही मृत्यूशी झुंज देतेय. रायबरेलीमध्ये घडवून आणलेल्या अपघातानंतर पीडिता आणि तिच्या वकिलांवर केजीएयू ट्रॉमा सेंटरमध्ये उपचार सुरू आहेत. दोघांचीही प्रकृती अत्यंत नाजूक अवस्थेत आहे. दोघं पाचव्या दिवशीही व्हेंटिलेटरवर आहेत. केजीएमयू ट्रॉमा सेंटर व्यवस्थापनाकडून दोन्ही जखमींचं मेडिकल बुलेटीन जारी करण्यात आलंय.

दुसरीकडे, राज्य महिला आयोगाच्या अध्यक्ष विमला बाथम यांनी पीडिता आणि वकील आता व्हेंटिलेटरवर नसल्याचा दावा केला होता. परंतु, रुग्णालय प्रशासनानं मात्र दोन्ही जखमी अजूनही व्हेंटिलटेरवर आहेत. 

गुरुवारी सीबीआयची एक टीम अपघातात जखमी झालेल्या पीडिता आणि तिच्या वकिलांची प्रकृती जाणून घेण्यासाठी केजीएमयू ट्रामा सेंटरमध्ये दाखल झाली. या प्रकरणाची सुनावणी पुन्हा सुरू झाल्यानंतर सर्वोच्च न्यायालयानं सीबीआयला, उन्नाव बलात्कार प्रकरणातील पीडितेच्या अपघात प्रकरणाची चौकशी सात दिवसांत पूर्ण करण्याचे आदेश दिले आहेत. 

अधिक वाचा : उन्नाव बलात्कार - हत्या : तिची चूक एवढीच की, तिनं भाजपा आमदारावर बलात्काराचा आरोप केला...

सॉलिसिटर जनरलकडून चौकशीसाठी ३० दिवसांचा अवधी मागितला गेला होता. परंतु, सरन्यायाधीश रंजन गोगई यांनी सात दिवसांत चौकशी करण्याचे आदेश देत अधिक अवधीची मागणी फेटाळून लावली.

यावेळी, सरन्यायाधीशांनी पीडितेच्या प्रकृतीबद्दल विचारणा करत, पीडितेला एअरलिफ्ट करून एम्स रुग्णालयात हलवता येऊ शकतं का? याबद्दलही माहिती घेतली. 

Read More