Marathi News> भारत
Advertisement

मच्छीमारांना सापडला अनोखा मासा; किंमत तब्बल...

माशाला पाहण्यासाठी नागरिक मोठी गर्दी करत आहेत.

मच्छीमारांना  सापडला अनोखा मासा; किंमत तब्बल...

भुवनेश्वर : ओडिशा (Odisha) राजनगर येथील तालचुआ परिसरातून एक अनोखा मासा पकडण्यात आला आहे. हा मासा १० हजार रुपये प्रति किलोग्रॅमच्या दराने विकला जाणार असल्याची माहिती मिळत आहे. या माशाची किंमत जवळपास २ लाख रुपये सांगण्यात येत आहे. 

या माशाचं नाव मयूरी मासा असल्याचं बोललं जात आहे. या दुर्लभ प्रजातीच्या माशाला पाहण्यासाठी परिसरातील नागरिकांनी मोठी गर्दी केली होती. हा मासा विकण्यापूर्वी लोकांना पाहण्यासाठी ठेवण्यात आला आहे.

याआधी सप्टेंबर महिन्यात ओडिशाच्या चंदवाली भागात ड्रोन सागर नावाचा एक अनोखा मासा आढळला होता. हा मासा एका मच्छीमाराने पकडला होता. त्या माशाचं वजन जवळपास १०७ किलो असल्याचं सांगण्यात आलं होतं.

  

fallbacks

त्यानंतर एका औषधांच्या कंपनीने ७ लाख ४९ हजार रुपयांत हा मासा खरेदी केला होता. 

Read More