Marathi News> भारत
Advertisement

Budget2021 :अर्थसंकल्पाच्या सर्व अपडेट्ससाठी डाऊनलोड करा नवे ऍप

 केंद्र सरकारने यासाठी ऍप लॉंच केलंय. हे कसं वापरायचं याबद्दल समजून घेऊया. 

Budget2021 :अर्थसंकल्पाच्या सर्व अपडेट्ससाठी डाऊनलोड करा नवे ऍप

नवी दिल्ली : तुम्हाला अर्थसंकल्प 2021 च्या सर्व अपडेट्स वाचायच्या असतील तर तुम्हाला वेगवेगळ्या वेबसाईट्सवर जाण्याची गरज नाहीय. अर्थसंकल्प समजून घेण्यासाठी कोणाच्या मदतीची वाट पहावी लागणार नाही. केंद्र सरकारने यासाठी ऍप लॉंच केलंय. हे कसं वापरायचं याबद्दल समजून घेऊया. 

केंद्रीय अर्थमंत्री निर्मला सीतारमण (Nirmala Sitharaman) यांनी अर्थसंकल्प 2021 me"r Union Budget Mobile App लॉन्च केलंय. भारत सरकारचे हे ऍप तुम्ही गुगल प्ले स्टोअरवरुन (Google App Store) डाउनलोड करु शकता. ऍप स्टोरमध्ये जाऊन Union Budget टाइप करा. ज्याच्याखाली NIC eGov Mobile Apps लिहिले असेल ते ऍप डाऊनलोड करा. किंवा तुम्ही थेट www.indiabudget.gov.in वर जाऊन देखील ऍप मिळवू शकता.

डाऊनलोडर्स वाढले

50 हजारपेक्षा जास्तवेळा हे ऍप डाऊनलोड झालंय. ऍप लॉंच झाल्यानंतर काही वेळापासूनच सर्वसामान्य नागरिकांनी हे डाऊनलोड करण्यास सुरुवात केली.

काय होईल फायदा ?

मिळालेल्या माहितीनुसार या ऍपमध्ये केंद्रीय अर्थमंत्री निर्मला सितारामण यांचे संपूर्ण अर्थसंकल्पीय भाषण,  Annual Financial Statment, Demand for Grants, फायनांस बिल (Finance Bill)आणि बजेटच्या मुख्य मुद्द्यांची माहिती मिळेल.

आर्थिक वर्ष 2021-22 चा केंद्रीय अर्थसंकल्प आज संसदेत मांडला जाणार आहे. कोरोनाची साथ आणि लॉकडाऊनमुळे आर्थिक अडचणीत सापडलेल्या 'कॉमन मॅन'साठी केंद्रीय अर्थमंत्री निर्मला सीतारमण यांच्या पोतडीमध्ये काय असेल, याची उत्सुकता आहे. 

रोजगार निर्मिती, ग्रामविकासावर भर देताना सर्वसामान्य करदात्यांना अर्थमंत्री दिलासा देऊ शकतात. परकीय गुंतवणूक अधिकाधिक आकर्षित करून वित्तीय तूट भरून काढण्याचा प्रयत्न या अर्थसंकल्पात होऊ शकतो. 

यंदाचा अर्थसंकल्प हा अद्वितीय असेल, असं काही दिवसांपूर्वी अर्थमंत्र्यांनी म्हटलं होतं. याची कशी प्रचिती त्या देतात याकडे सगळ्या देशाचं लक्ष लागलंय. 

जगातील सर्वात वेगानं विकसित होणाऱ्या अर्थव्यवस्थेचं उद्दिष्ट साध्य करण्याचं आव्हान अर्थमंत्र्यांसमोर असेल.

Read More