Marathi News> भारत
Advertisement

१ फेब्रवारीला अरुण जेटली सादर करणार अर्थसंकल्प...

२०१८-२०१९ साठीचा केंद्रीय अर्थसंकल्प १ फेब्रवारीला

१ फेब्रवारीला अरुण जेटली सादर करणार अर्थसंकल्प...

नवी दिल्ली : २०१८-२०१९ साठीचा केंद्रीय अर्थसंकल्प १ फेब्रवारीला

जीएसटीचं सावट

नरेंद्र मोदींच्या जीएसटी लागू करण्याच्या धाडसी निर्णयाच्या पार्श्वभूमीवर यंदाचा अर्थसंकल्प सादर केला जाणार आहे. अर्थमंत्री अरुण जेटली येत्या १ फेब्रवारीला अर्थसंकल्प सादर करणार आहेत. जीएसटीमुळे काहीसा प्रतिकूल परिणाम अर्थव्यवस्था थंडावली आहे. भारताची अर्थव्यवस्था ही आशियातली तिसऱ्या क्रमांकाची अर्थव्यवस्था आहे. 

विकास योजनांवर दिला जाणार भर

जीएसटीमुळे ढेपाळलेली अर्थव्यवस्था रुळावर परत कधी येणार याबद्दल अनिश्तिता आहे. मात्र अर्थतज्ञांच्या मतानुसार या वर्षीच्या अर्थसंकल्पात वित्तीय तूट कमी करण्यापेक्षा विकासाच्या आणि रोजगारवाढीच्या योजनांवरच्या तरतूदी वाढवल्या जातील. 

मंदावलेला विकासदर

यावर्षी भारताच्या अर्थव्यवस्थेवर नोटबंदी आणि जीएसटीचं मोठंच सावट पडलं आहे. या दोन्ही निर्णयांमुळे अर्थव्यवस्था ढवळून निघालीय. भारताचा आर्थिक विकासदर ६.३ टक्कयांपर्यत मंदावला आहे. गेल्या वर्षी तोच ७.५ टक्कयांवर होता. २०१७ च्या दुसऱ्या तिमाहींत तर विकासदराने ५.७ टक्कयांचा निच्चांक नोंदवला. 

Read More