Marathi News> भारत
Advertisement

केंद्रीय अर्थसंकल्प आज संसदेत, अर्थमंत्री जेटलींकडे सर्वांची नजर

 स. ११ वाजता अर्थमंत्र्यांच्या भाषणाला सुरूवात होणार आहे.

 केंद्रीय अर्थसंकल्प आज संसदेत, अर्थमंत्री जेटलींकडे सर्वांची नजर

नवी दिल्ली :    केंद्रीय अर्थसंकल्प आज संसदेत मांडला जाणार आहे. नोटाबंदी आणि जीएसटी अंमलबजावणीमुळे अर्थव्यवस्थेच्या विकास दरावर परिणाम झाल्याने अर्थमंत्री अरूण जेटली यांच्याकडे सर्वांच्या नजरा लागून राहिल्या आहेत. ११ वाजता अर्थमंत्र्यांच्या भाषणाला सुरूवात होणार आहे.

हा मोदी सरकारच्या कार्यकाळातील अखेरचा अर्थसंकल्प असल्याने याला विशेष महत्त्व आहे. 'आम आदमी' यातून काही सवलत मिळणार का की तोंडाला पाने पुसली जाणार हे पाहणेही महत्त्वाचे आहे.

मध्यमवर्गाला करांतून सवलत ! 

अर्थसंकल्पात राजकारण आणि अर्थकारणाचा समतोल साधायचा  असेल सामान्य करदात्यालाही काहीतरी द्यावं लागेल. भाजपचा मतदार मध्यमवर्गात आहे.

देशातल्या वाढणाऱ्या मध्यमवर्गाला करांतून सवलत अपेक्षित आहे.

 - अर्थसंकल्पात करमुक्त उत्पन्नाची सध्याची अडीच लाखांची मर्यादा तीन लाखावर जाण्याची शक्यता आहे.

- कलम 80 सी अंतर्गत येणाऱ्या करमुक्त गुंतवणूकीची मर्यादाही 50 हजारांनी वाढण्याची शक्यता आहे.

- मेडिकल इन्शुरन्सवरील खर्चाचीला उत्पन्नातून मिळणारी वजावट वाढण्याची शक्यता आहे.

सोन होणार स्वस्त 

यामध्ये सोन्यावरील आयात शुल्क कमी होण्याची शक्यता आहे. त्यामुळे सोनं ६०० ते १२०० रूपयांनी स्वस्त होऊ शकतं.

अर्थसंकल्पात अरूण जेटली याबाबतचा निर्णय घेऊ शकतात अशी शक्यता इंडियन बुलियन ज्वेलर्स असोसिएशनने वर्तवली आहे. 
  

Read More