Marathi News> भारत
Advertisement

दहशतवाद्यांच्या निशाण्यावर बौद्ध महोत्सव आणि दलाई लामा

धर्मगुरु दलाई लामा यांच्या दौऱ्यादरम्यान बिहारच्या बोधगयामधील महाबोधी मंदिराजवळ स्फोटकं सापडल्याने एकच खळबळ माजली आहे.

दहशतवाद्यांच्या निशाण्यावर बौद्ध महोत्सव आणि दलाई लामा

नवी दिल्ली : धर्मगुरु दलाई लामा यांच्या दौऱ्यादरम्यान बिहारच्या बोधगयामधील महाबोधी मंदिराजवळ स्फोटकं सापडल्याने एकच खळबळ माजली आहे.

न्यूज 24 या हिंदी न्यूज चॅनेलने दिलेल्या बातमीनुसार, पोलिसांना शोधकार्यात २ जीवंत बॉम्ब सापडले आहेत. यानंतर पोलिसांनी संपूर्ण मंदिर परिसर आपल्या ताब्यात घेतला आहे. धर्मगुरु दलाई लामा बोधगयामध्येच आहेत. २ जानेवारीपासून ते महाबोधी मंदिरात पूजेमध्ये सहभागी होत आहेत.

बोधगयामध्ये होणाऱ्या बौद्ध महोत्सवाला दहशतवाद्यांकडून लक्ष्य केलं जाऊ शकतं अशी माहिती मिळाली आहे. यावेळी दहशतवादी दलाई लामा यांना देखील लक्ष्य करु शकतात अशी गुप्त माहिती मिळाली आहे.

आंतराष्ट्रीय गुप्तचर यंत्रणेने अशी माहिती बिहार पोलीस मुख्यालयला दिली आहे. मिळालेल्या माहितीनुसार बोधगया मंदिराची सुरक्षा अधिक कडक करण्याची सूचना बिहार पोलिसांना दिली आहे. बिहार पोलिसांनी हा अलर्ट गंभीरपणे घेऊन मंदिराला पूर्णपणे ताब्यात घेतलं आहे.

मंदिर सुरक्षेसाठी 1000 पोलीस, 200 अश्वरोही दलाचे रक्षक आणि एक रैफ यांना तैनात करण्यात आलं आहे.

Read More