Marathi News> भारत
Advertisement

पेट्रोल पंपवर फसवणूक होतेय? या टीप्स लक्षात ठेवा...

... तर तुम्हालाही सावध राहायला हवं

पेट्रोल पंपवर फसवणूक होतेय? या टीप्स लक्षात ठेवा...

मुंबई : पेट्रोल - डीझेलच्या वाढत्या किंमतींनी सामान्यांना हैराण करून टाकलंय. अशा वेळी पेट्रोल पंपावर ग्राहकांची फसवणूक हीदेखील सामान्य बाब झालीय. गेल्या काही दिवसांमध्ये भारतभरात अनेक ठिकाणी पेट्रोल पंपावर ग्राहकांची फसवणूक उघड झालीय. केवळ दिल्लीत एप्रिल २०१४ ते डिसेंबर २०१७ मध्ये अशा फसवणुकीचे ७८५ प्रकरणं उघड झालीत. पेट्रोल भरताना आपल्या गाडीत किंवा बाईकमध्ये टाकीच्या मापापेक्षा जास्त पेट्रोल भरल्याचं दाखवत आपल्याकडून पैसे उकळण्याचा प्रकार एव्हाना तुमच्यासोबतही घटला असेल... तर तुम्हालाही सावध राहायला हवंय... नाहीतर त्याचा परिणाम तुमच्या खिशावर होऊ शकतो. 

राऊंड फिगरमध्ये पेट्रोल भरणं टाळा... 

पेट्रोल चोरीसाठी साधारणत: पेट्रोल भरताना १०० रुपये, २०० रुपये किंवा ५०० रुपये अशी सेटींग केली जाते. ग्राहकही राऊंड फिगरमध्येच पेट्रोल भरण्याची ऑर्डर देतात. पण अनेकदा या संख्या मशीनवर फिक्स केल्या जाऊ शकतात. त्यामुळे फसवणुकीची शक्यताही वाढते. जेव्हा तुम्ही पेट्रोल भरता तेव्हा १०५ रुपये, २०५ रुपये किंवा १ लीटर २५५ रुपये अशा थोड्या हटके अंकांमध्ये भरण्यासाठी सांगा... अशा वेळी पेट्रोल भरताना पेट्रोल चोरी टाळता येते.

टाकी रिकामी ठेऊ नका

बाईक किंवा कारची इंधनाची टाकी जितकी रिकामी असेल तितकी त्यामध्ये हवा अधिक असेल... त्यामुळे पेट्रोल भरल्यानंतर हवेमुळे पेट्रोलचं प्रमाण कमी होतं. हे टाळायचं असेल तर कमीत कमी अर्धी टाकी तरी भरलेली असेल याकडे लक्ष द्या 

डिजिटल मीटर असणाऱ्या पंपवर जा

जुन्या पेट्रोल पंपावरच्या मशीनही जुन्या असू शकतात. त्यामुळे या मशीनद्वारे फसवणूक सहज शक्य आहे... डिजिटल मीटर असणाऱ्या पंपावर हा धोका टाळता येऊ शकतो.

नोजल बटन चेक करा

पेट्रोल भरणाऱ्या व्यक्तीला पेट्रोल भरायला सुरुवात केल्यानंतर नोजल बटनावरून हात हटवण्यासाठी सांगणं विसरू नका. पेट्रोल भरताना नोजल बटन दाबून राहिल्यानं स्पीड कमी होतो... आणि सहजच पेट्रोलचोरी केली जाऊ शकते.

मीटर स्पीडकडेही लक्ष द्या

तुम्ही पेट्रोल भरण्यासाठी ऑर्डर दिली असेल आणि मीटर खूप फास्ट सुरु असेल तर काही तरी गडबड आहे हे लक्षात घ्या. पेट्रोल भरणाऱ्या व्यक्तीला ताबडतोब स्पीड सामान्य करण्याचे निर्देश द्या.  

Read More