Marathi News> भारत
Advertisement

लग्नाहून परतताना कारचा भीषण अपघात; नवरा-नवरीसह 5 जणांचा जागीच मृत्यू

Accident News In Marathi: छत्तीसगडमध्ये एक भीषण अपघात घडला आहे. या अपघातात नवरा-नवरीसह पाच जणांचा मृत्यू झाला आहे. 

लग्नाहून परतताना कारचा भीषण अपघात; नवरा-नवरीसह 5 जणांचा जागीच मृत्यू

Accident News In Marathi:  छत्तीसगडच्या जांजगीर-चंपा जिल्ह्यात रविवारी सकाळी भीषण अपघात घडला आहे. लग्नाहून परतणाऱ्या कारला ट्रकने जोरदार धडक दिली आहे. हा अपघात इतका भीषण होता की नवरा-नवरीसह पाच जणांचा जागीच मृत्यू झाला आहे. स्थानिक लोकांनी या दुर्घटनेची माहिती आत्पत्कालीन नंबरवर फोन करुन दिली आहे. कार रामगढहून अकलतारा येथे जात होता. तर, मुलमुला पोलीस ठाण्याच्या हद्दीत असलेले परकिया जंगल येथे अपघात घडला आहे. 

घटनास्थळी पोहोचलेल्या पोलिसांनी स्थानिक लोकांच्या मदतीने दुर्घटनाग्रस्त कार मोठ्या प्रयत्नाने बाहेर काढली आहे. त्यानंतर रुग्णवाहिकेच्या मदतीने रामगढ आरोग्य केंद्रात दाखल केले आहे. मात्र. डॉक्टरांनी सर्वांना मृत जाहीर केले. यानंतर सर्वांचे मृतदेह शवविच्छेदनासाठी पाठवण्यात आले आहे. मिळालेल्या माहितीनुसार, मयत लग्नात सहभागी झाले होते. त्यानंतर ते बलौदा येथे परतत होते. त्याचवेळी ट्रकने त्यांच्या कारला धडक दिली. त्यानंतर ट्रक ड्रायव्हर घटनास्थळावरुन फरार झाला आहे. 

नवरा-नवरीचा जागीच मृत्यू 

या घटनेची माहिती मिळताच, वधु-वरांच्या घरात शोककळा पसरली आहे. दोन दिवसांपूर्वी ज्या घरांमधून गाण्यांचा आवाज घुमत होता आता त्या घरात काळीज चिरणारा आक्रोश करण्यात येत आहे. नातेवाईकांची लगबग असलेल्या घरात आता एकच शांतता पसरली आहे. बलौदा येथील रहिवासी शुभम सोनी आणि शिवरीनारायण येथील नेहा यांचा शनिवारी रात्री विवाह पार पडला होता. रविवारी सकाळी शुभम नेहाला घेऊन कारने घरी परतत होता. त्यावेळी कारमध्ये नवरा-नवरीसोबतच कुटुंबातील अन्य तीन लोकं होते. 

सकाळी पाच वाजण्याच्या सुमारास पकरिया जंगलमध्ये चंडी देवी मंदिराच्याजवळ कार आणताच समोरुन वेगाने येणाऱ्या ट्रकने कारला धडक दिली. हा अपघात इतका भीषण होता की कारचा चक्काचुर झाला आहे. अपघाताचा आवाज ऐकताच स्थानिक लोक घटनास्थळी पोहोचले आणि कारमध्ये अडकलेल्या लोकांना बाहेर काढायचा प्रयत्न करु लागले. पोलिसांनादेखील नंतर कळवण्यात आले. त्यानंतर स्थानिकांच्या मदतीने त्यांना आरोग्यकेंद्रात दाखल करण्यात आले. मात्र, सर्वांचा जागीच मृत्यू झाल्याचे डॉक्टरांनी जाहिर केले. 

Read More