Marathi News> भारत
Advertisement

'ट्रिपल तलाक' विरोधी विधेयक संसदेत सादर

ट्रिपल तलाक संबंधीचं विधेयक कायदामंत्री रविशंकर प्रसाद यांनी आज संसदेत मांडलं.

'ट्रिपल तलाक' विरोधी विधेयक संसदेत सादर

नवी दिल्ली : ट्रिपल तलाक संबंधीचं विधेयक कायदामंत्री रविशंकर प्रसाद यांनी आज संसदेत मांडलं. तोंडी, किंवा लेखी तसंच इमेल, एस एम एस आणि व्हॉट्स ऍपद्वारे दिला जाणारा तिहेरी तलाक या विधेयकाद्वारे बेकायदेशीर ठरवला जाणार आहे.

अशाप्रकारे तलाक देणा-या पतीला ३ वर्षांच्या तुरुंगवासाच्या शिक्षेची तरतूदही या विधेयकात करण्यात आली आहे. याखेरीज दोषी पतीला दंड ठोठावण्याची तरतूदही या विधेयकात करण्यात आली आहे. या विधेयकाला लोकसभेत एमआयएम, राष्ट्रीय जनता दल आणि बिजू जनता दल यांनी विरोध केलाय. या विधेयकामुळे मुस्लीम महिलांच्या अधिकारांचं उल्लंघन होत असल्याचा त्यांचा आरोप आहे. 

 

Read More