Marathi News> भारत
Advertisement

खुल्लम खुल्ला प्यार! धावत्या बाइकवर कपलचं Kiss, कपलचा रोमान्सचा Video Viral

Viral Video : धावत्या बाइकवर रोमान्सचा करतानाचा एका कपलचा व्हिडीओ पुन्हा एकदा व्हायरल झाला आहे. वर्दळच्या रस्त्यावर या जोडप्याने हद्द केली आहे. एकमेकांना किस करतानाचा हा व्हिडीओ धक्कादायक आहे. 

खुल्लम खुल्ला प्यार! धावत्या बाइकवर कपलचं Kiss, कपलचा रोमान्सचा Video Viral

fallbacks

Viral Video : नवीन वर्षाची सुरुवात झाली आणि सोशल मीडियावर धावत्या बाइकवर, स्कूटर किंवा कारच्या टपावर रोमान्स करतानाचा कपलचा धुमाकूळ सुरु होता. एका व्हिडीओ नंतर दुसरा तिसरा अनेक घटना समोर आल्या होत्या. जण काही तो कपलमधील रोमान्सचा नवीन ट्रेंड झाला होता. वर्दळची रस्त्यावरुन धावत्या बाइकवर कपलचा रोमान्स हा त्यांचा जीवासोबतच रस्त्यावरील लोकांच्या जीवाशी खेळ होता. पोलिसांनी या घटनांची दखल घेत कारवाईला सुरुवात केली. तरुण तरुणींना पोलिसांचा धाक बसला असं वाटत असतानाच पुन्हा एका कपलचा बाइकवरील रोमान्सचा व्हिडीओ समोर आला आहे. (trending today couple kissed on moving bike video viral Jaipur News trends)

धावत्या बाइकवर कपलचा रोमान्स!

राजस्थानमधील जयपूरमध्ये धावत्या बाइकवर कपलचा रोमान्स करतानाचा व्हिडीओ समोर आला आहे. सोशल मीडियावर या घटनेचा व्हिडीओ तुफान व्हायरल झाला आहे. हा व्हिडीओ जयपूरच्या सांगानेर भागातील असल्याचं बोलं जातं आहे. 

खरं हा व्हिडीओ नीट पाहिला तर तुम्हाला कळलं की या बाइकवर दोन तरुण आणि एक तरुण सवार आहे. या व्हिडीओमध्ये यांनी रस्ते वाहतुकीच्या नियमाचे उल्लंघन केलं आहे. बाइकस्वार तरुणाने हेल्मेट घातलेलं दिसत नाही. तर त्यामागे एक तरुण बसला आहे आणि त्याच्यामागे एक तरुणी. 

हेसुद्धा वाचा - Video : पत्नीला माहेरी सोडून गर्लफ्रेंडसोबत पतीची रासलीला, आक्षेपार्ह अवस्थेत असताना अचानक पत्नी आली अन्...

तुम्ही पाहू शकता दिवसाढवळा रस्त्यावर कपलचा रोमान्स सुरु आहे. रस्त्यावर वाहनांची दोन्ही बाजूने ये जा सुरु असून वर्दळीचा रस्ता दिसतोय. अशात स्वत:च्या जीवासोबत रस्त्यावरील इतर लोकांच्या जीव धोक्यात घालून असे अश्लील चाळे करत असल्याने नेटकरी संतापले आहेत. 

हा व्हिडीओ सोशल मीडिया प्लॅटफॉर्म ट्वीटर म्हणजे X वरील rajni singh या अकाऊंटवर पोस्ट करण्यात आला आहे. 

Read More