Marathi News> भारत
Advertisement

VIDEO : बटाटा-कोबीसारखे पोत्यात भरुन आणले 300 साप अन् मग...

Viral Video : सोशल मीडियावर भयानक व्हिडीओ नेटकऱ्यांना हैराण करुन सोडतोय. एक व्यक्ती बटाटा - फुलकोबी जशी पोत्यात भरून आणली जाते, तसं त्याने 300 साप पोत्यात भरुन आणले आणि मग...

VIDEO : बटाटा-कोबीसारखे पोत्यात भरुन आणले 300 साप अन् मग...

Trending Video : सापाचं नाव घेतलं तरी आपल्याला घाम फुटतो. पण सोशल मीडियावर एक व्हिडीओ पाहून तर अंगावर काटा आल्याशिवाय राहत नाही. आपण पोत्यांमध्ये बटाटा, कांदा किंवा फुलगोबी भरुन आणलेली पाहिली आहे. पण या व्हिडीओमध्ये एका व्यक्तीने एक नाही 10 नाही 100 नाही तर तब्बल 300 साप भरुन आणले आहेत.  हा व्यक्ती इतके साप एकत्र भरुन काय करतोय आणि कुठे नेतो आहे असा प्रश्न नेटकऱ्यांना पडला आहे. एवढ्या मोठ्या प्रमाणात 300 साप एकत्र पाहणे हे एका भयानक दृश्यंपेक्षा कमी नाही.  हा व्हिडीओ पाहून अनेकांची झोप उडाली आहे. 

थरकाप उडविणारा व्हिडीओ

सोशल मीडियावर मोठ्या प्रमाणावर व्हायरल होत असलेल्या या व्हिडिओमध्ये एक माणूस हिरवी बोरी घेऊन जंगलात जाताना दिसत आहे.  त्या पोत्यात 300 साप आहेत. तो व्यक्ती ते पोत जमिनीवर उलट करतो आणि त्यातील खचाखच भरलेले साप जमिनीवर सोडतो. एवढंच नाही तर तो आपल्या हाताने एकमेकांमध्ये गुंतलेले साप सोडवतो आणि त्यांना जंगलात सोडून देतो. या व्हिडीओमध्ये शेवटचं असंही दिसत की, तो व्यक्ती त्या सापांकडे पाहून हात जोडून नमस्कार करतो. आपल्या देशात सापाला देवाचं रुप मानतात. हा व्हिडिओ मोठ्या प्रमाणात व्हायरल होत आहे. (Trending man who brought 300 snakes in gunny Shocking Video Viral on Social media)

 
 
 
 
 
 
 
 
 
 
 
 
 
 
 

A post shared by Meme wala (@memewalanews)

कुठला आहे हा व्हिडीओ?

हा व्हिडीओ कुठला आहे याबद्दल काही समजलं नाही. मात्र हा व्हिडीओ memewalanews नावाच्या इंस्टाग्राम अकाउंटवर पोस्ट करण्यात आला आहे. व्हिडिओ पाहिल्यानंतर नेटिझन्स नेहमीप्रमाणे आपापल्या प्रतिक्रिया देत आहेत. हा व्हिडिओ सध्या सोशल मीडियाच्या सर्व प्लॅटफॉर्मवर व्हायरल होत आहे.

Read More