Marathi News> भारत
Advertisement

प्रेम नको, सर्वांना फक्त SEX हवा होता, मग पैसे घेऊन का नको? 26 वर्षांचा जेरी बनला ट्रान्सजेंडर सेक्स वर्कर

26 वर्षांचा तरुण, पण त्याला आपण मुलगी असल्याचा भास होत होता, एमकॉम होऊन त्याला सीए बनायचं होतं, पण आयुष्यात असं एक वळण आलं ज्यामुळे तो वेश्यावृत्तीचच्या दलदलीत ढकलला गेला

प्रेम नको, सर्वांना फक्त SEX हवा होता, मग पैसे घेऊन का नको?  26 वर्षांचा जेरी बनला ट्रान्सजेंडर सेक्स वर्कर

Transgender Sex Worker : 12 जून 1992 मध्ये उत्तर प्रदेशमधल्या (Uttar Pradesh) आझमगडमध्ये एका मध्यमवर्गीय कुटुंबात जेरीचा जन्म झाला. जेरीचं कुटुंब तसं मोठं होतं, प्रेम करणारी आई, धाक असणारे वडिल, काका, मामा, मावशी आणि भाऊ-बहिण असं हसतं खेळतं आणि भरलेलं कुटुंब. अशा मोठ्या कुटुंबात जेरीचा जन्म झाला. वंशाचा दिवा जन्मल्याने घरात आनंदाचं वातावरण होतं. जेरीचं पालनपोषणही मुलांप्रमाणेच सुरु होतं. मुलांसारखे केस कापले जायचे, मुलांसारखेच कपडे घातले जायचे. बहिणी भाऊ म्हणून राखी बांधायच्या तर आई मुलगा म्हणून बहिणींपेक्षा जास्त प्रेम करायची. 

लिपस्टीक आणि मेकअप आवडू लागला
सर्वकाही सामान्य सुरु होतं, पण हळुहळु सर्व बदलत जात असल्यासारखं वाटलं. जेरी जसजसा मोठा होत होता, त्याच्या शरीरात एक वेगळं जग तयार होत होतं. घरात अनेक बहिणी होत्या, त्या साजश्रृंगार करायच्या. जेरीही त्यांची नक्कल करु लागला. लपूनछपून तो बहिणींची लिप्स्टिक लावणं, बहिणींची ओढणी घेऊन नाचणं असे प्रकार करु लागला. बहिणींसारखंच नटापटा करायला त्याला आवडू लागलं. सुरुवातीला लहान आहे म्हणून घरच्यांनीही लक्ष दिलं नाही. पण लाडाची जागा आता थपडेने घेतली होती. लिपस्टिक किंवा मेकअप केला की जेरीला मोठ्यांकडून मार मिळू लागला. बहिणी त्याची समजूत घालायच्या. तु मुलगा आहेस, मुलांसारखे कपडे घाल, बाहेर जाऊन त्यांच्याबरोबर खेळ असा सल्ला द्यायच्या. पण जेरीला बहिणींमध्ये राहाणं चांगलं वाटत होतं. बाहेर गेलं की मुलं जेरीला वेगळ्या नजरेने पाहात त्यामुळे जेरीला मुलांची भीती वाटत असे.

मुलांनी एकट्याला पाहून घेरलं
शाळेत असताना घडलेली एक घटना जेरीच्या आयुष्याला कलाटणी देणारी ठरली. संध्याकाळची वेळ होती, अंधार पडू लागला होता. जेरी शाळेतून घरी जाण्यासाठी निघाला. पण वाटेत एका मोकळ्या मैदानात काही मुलांनी जेरीला घेरलं. त्यांना वाटतं होतं की जेरी मुलगी आहे. त्यांनी जबरदस्तीने जेरीचे कपडे काढले, जेरी ओरडत होता, सोडण्याची विनंती करत होता, पण त्या मुलांनी जेरीचे संपूर्ण कपडे काढले. जेरीचा प्रायव्हेट पार्ट मुलांसारखाच असल्याचं पाहिल्यानंतर त्यांनी जेरीला सोडून दिलं. पण या दरम्यान जेरीच्या पोटोला मार बसला होता. त्याच परिस्थितीत तो घरी आला. झालेला प्रकार त्याने घरी कोणालाच सांगितला नाही.

जेरी बनला थट्टेचा विषय
इतर मुलांप्रमाणेच जेरीसुद्धा शिक्षण घेऊन चांगली नोकरी करण्याची इच्छा बाळगून होता. कानपूर विद्यापीठातून त्याने एम कॉम केलं आणि सीएची परीक्षाही दिली. पण आता परिस्थिती अशी होती की त्याच्या चालण्या-बोलण्यावरुन राहण्यावरुन तो लोकांच्या थट्टेचा विषय बनला होता. घरच्यांना त्याच्यामुळे अनेकवेळा लाजीरवाण्या प्रसंगांना सामोरं जावं लागलं होतं. जेरी पुरुष होता, पण महिलांसारखा दिसत होता, त्याच्या मनाच्या एका कोपऱ्यात मुलींसारख्या सुप्त भावना दडल्या होत्या.  

जेरी सेक्स वर्कर कसा बनला?
आपली ओळख लपवण्यासाठी जेरी दिल्लीत आला. पण उच्चशिक्षित असूनही त्याला नोकरी मिळत नव्हती. कदाचित डिग्रीपेक्षा त्याच्या दिसण्यामुळे त्याला नाकारलं जात होतं. या सर्व परिस्थितीत नकळत तो काही लोकांच्या संपर्कात आला, जे जेरीसारखेच होते. त्यांनाही कळत नव्हतं की ते पुरुष आहेत की महिला. अनोळखी शहरात त्याच्यासारख्या लोकांचीच त्याला साथ मिळाली. या सर्वांनी मिळून एका एनजीओसाठी (NGO) काम करायला सुरुवात केली. आपल्यासारख्या लोकांचं काऊन्सिलिंग (Counciling), त्यांच्या आई-वडिलांची समजूत घालणं अशी काम ते सर्व करत होते. सर्व काही ठिक सुरु होतं. पण ज्या खऱ्या प्रेमाच्या शोधात जेरी होता, ते त्याला अजूनही मिळालं नव्हतं. रात्रीच्या अंधारात सर्व जण प्रेम करायचे पण दिवसा ओळखही दाखवायचे नाहीत. त्याचवेळी जेरीने निर्णय घेतला लोकांना फक्त सेक्स हवा आहे तर मग पैसे का घ्यायचे नाहीत?

जेरीचा पहिला क्लायंट
एका समलैंगिक साईटवर (Homosexual Site) जेरीची ओळख एका व्यक्तीशी झाली. त्या माणसाने जेरीला भेटायला बोलावलं. पण त्याला फक्त सेक्स हवा होता. जेरीने पहिल्यांदा पैसे घेऊन त्या व्यक्तीसोबत सेक्स केला. त्यावेळी जेरीचं वय अवघं 22 होतं. त्याने एका रात्रीचे 1500 रुपये जेरीच्या हातात ठेवले. पैसे हातात पडल्यावर आपण जो मार्ग निवडला आहे तो योग्य आहे की अयोग्य याचा विचार जेरीच्या मनात येऊ लागला. पण एकदा का या मार्गावर आलात की परतीचे मार्ग बंद होतात. जेरीच्या बाबतीतही नेमकं हेच घडलं. आता जेरीला दर रात्री तयार व्हावं लागतं. त्याचे 15 क्लायंट आहेत. दर रात्री कोणा ना कोणाकडून जेरीला बोलावलं जातं. 

जेरी ज्या प्रेमाच्या शोधात होता ती आता सर्विस झाली होती. जितका जास्त पैसे तितका जास्त त्रास सहन करावा लागत होता. काही जणं वाईल्ड सेक्स करत होते, काही जणांकडून डर्टी सेक्स केला जात होता. काही लोकांची वेगळीच फॅन्टसी होती, जितका जास्त त्रास देता येईल तितका जास्त त्यांना सेक्स करताना मजा वाटत होती. काही लोकांना तोपर्यंत मजा येत नव्हती जोपर्यंत समोरच्या व्यक्तीच्या शरीरातून रक्त येत नाही. 

'नशा करत नसल्याने त्रास जास्त व्हायचा'
हे सर्व करत असताना जेरीला त्रास सहन करावा लागत होता. कारण जेरी नशा करत नव्हता. पूर्ण शुद्धीत तो आपल्या क्लायंटची इच्छा पूर्ण करत असे. क्लायंट नशा करुन, ड्रग्स घेऊन किंवा शक्तीवर्धक गोळ्या घेऊन सेक्स करत असल्याचं जेरी सांगतो. अनेकवेळा संपूर्ण रात्र हा प्रकार चालत असल्याचे अनुभवही त्याला आले.

रात्री प्रेम, दिवसा अनोळखी
दिवसा उजेडात मोठ-मोठ्य कारमधून फिरणारे व्हाईट कॉलर रात्रीच्या अंधारात जेरीचे क्लायंट असायचे. यात उच्चपदस्थ अधिकारी, राजकारणी, पोलीस अशा मोठ्या लोकांचा समावेश आहे. याच्याशी जोडलेला एक किस्सा जेरीने सांगितला. जेरी एकदा दिल्लीतल्या कनॉट प्लेसमध्ये नोकरीसाठी इंटरव्ह्यू द्यायला गेला. पण जो अधिकारी जेरीचा इंटरव्ह्यू घेण्यासाठी आला तो जेरीचा क्लायंट होता. त्याने इंटरव्ह्यू घ्यायचं सोडून जेरीला आपण पुन्हा कधी भेटायचं याबाबत विचारलं. जेरी इंटरव्ह्यू न देताच तिथून बाहेर पडला.

Read More