Marathi News> भारत
Advertisement

Gold Silver Price : सोने पे सुहागा! ऐन लग्नघाईत सोनं-चांदीचे दर स्वस्त की महाग? वाचा आजचे नवे दर

Today Gold Rate :  लग्नाच्या हंगामात सोने खरेदी करण्याचा विचार करणाऱ्यांसाठी महत्त्वाची बातमी आहे. कारण लग्नसराईच्या हंगामात सोन्या-चांदीच्या दरात सातत्याने वाढ होत आहे. 

Gold Silver Price : सोने पे सुहागा! ऐन लग्नघाईत सोनं-चांदीचे दर स्वस्त की महाग? वाचा आजचे नवे दर

Gold Price Update: सध्या सगळीकडे लग्नाचा सिझन सुरू आहे. त्यामुळे लोक मोठ्या प्रमाणात सोने-चांदीची (gold silver rate) खरेदी करत आहेत. तुम्हीही आगामी काळात सोने खरेदी करण्याचा विचार करत असाल तर तुमच्यासाठी एक आनंदाची बातमी आहे. कारण या व्यापार सप्ताहाच्या पाचव्या आणि शेवटच्या दिवशीही पिवळ्या धातूच्या किमतीत वाढ झाली आहे. मात्र, सोमवारी सोन्याच्या दरात किरकोळ घसरण नोंदवण्यात आली, तर चांदीच्या दरात वाढ कायम आहे.

सोमवारी सोने 29 रुपये प्रति 10 ग्रॅमने स्वस्त झाले. तर चांदीच्या दरात 891 रुपयांची वाढ झाली. यानंतर सोमवारी सोन्याचा भाव 54000 रुपये प्रति 10 ग्रॅम आणि चांदीचा भाव 67000 रुपये प्रति किलोवर बंद झाला. सध्या लोकांना 2,300 रुपये प्रति 10 ग्रॅम पेक्षा स्वस्त सोने आणि 13,000 रुपये प्रति किलो चांदी स्वस्त खरेदी करण्याची संधी आहे. सराफा बाजारातील तज्ज्ञांचे म्हणणे मानायचे झाल्यास सोन्या-चांदीच्या दरातील वाढीचा कालावधी कायम राहू शकतो.

सोमवारी, या व्यापारिक आठवड्याच्या पहिल्या दिवशी, सोने ( Gold Rate) 29 रुपये प्रति 10 ग्रॅमच्या घसरणीसह 53908 रुपये प्रति किलोच्या पातळीवर बंद झाला. तर शुक्रवारी शेवटच्या व्यवहाराच्या दिवशी सोने 157 रुपये प्रति 10 ग्रॅमने महागले आणि 53937 रुपये प्रति 10 ग्रॅमवर बंद झाले.  

नवीनतम 14 ते 24 कॅरेट सोन्याचा दर

शुक्रवारी 24 कॅरेट सोने 29 रुपयांनी स्वस्त होऊन 53908 रुपयांवर आला आहे. तर 23 कॅरेट सोने 28 रुपयांनी स्वस्त होऊन 53693 रुपये झाले आहे. 22 कॅरेट सोने 27 रुपयांनी स्वस्त होऊन 49379 रुपये, तर 18 कॅरेट सोने 29 रुपयांनी स्वस्त होऊन 22, 40431 रुपये आणि 14 कॅरेट सोने 17 रुपयांनी स्वस्त होऊन 31536 रुपये प्रति 10 ग्रॅमवर बंद झाले.

वाचा : आजपासून जी-20 परिषदेला सुरुवात, नेमकं काय आहे G20? 

आतापर्यंतच्या उच्चांकापेक्षा सोने-चांदी स्वस्त

सोने सध्या 2292 रुपये प्रति 10 ग्रॅमने त्याच्या आतापर्यंतच्या उच्चांकापेक्षा स्वस्त विकले जात आहे. दरम्यान ऑगस्ट 2020 मध्ये सोन्याने सर्वकालीन उच्चांक गाठला होता. त्यावेळी सोन्याचा भाव 56200 रुपये प्रति दहा ग्रॅमच्या पातळीवर गेला होता. दुसरीकडे, चांदी 12958 रुपये प्रति किलो दराने त्याच्या सर्वोच्च पातळीपेक्षा स्वस्त होत आहे. चांदीचा आतापर्यंतचा उच्चांक 79980 रुपये प्रति किलो आहे.

आताच सोने खरेदी करा...

सराफा बाजारातील जाणकारांच्या मते,  सोन्या-चांदीच्या भावातील वाढीचा टप्पा आगामी काळातही कायम राहणार आहे. तसेच, या लोकांचे म्हणणे आहे की नवीन वर्ष 2023 मध्ये लवकरच सोन्याची किंमत सर्वोच्च पातळीच्या जवळ किंवा त्यापलीकडे पोहोचेल. अशा परिस्थितीत तुमचेही लग्न असेल आणि तुम्हाला सोने खरेदी करायचे असेल तर लवकरात लवकर खरेदी करा. जेणेकरून तुम्हाला त्याचा काही प्रमाणात फायदा होईल.

Read More